​‘रईस’ ​ vs ‘सुल्तान’ सामना रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 16:42 IST2016-05-04T11:12:56+5:302016-05-04T16:42:56+5:30

शाहरूख खानचा  ‘रईस’ आणि सलमान खानचा ‘सुल्तान’ असा सामना येत्या ईदला  बॉक्सआॅफिसवर रंगणार होता. मात्र आता ‘रईस’ विरूद्ध ‘सुल्तान’ ...

'Rais' vs 'Sultan' match canceled | ​‘रईस’ ​ vs ‘सुल्तान’ सामना रद्द

​‘रईस’ ​ vs ‘सुल्तान’ सामना रद्द

हरूख खानचा  ‘रईस’ आणि सलमान खानचा ‘सुल्तान’ असा सामना येत्या ईदला  बॉक्सआॅफिसवर रंगणार होता. मात्र आता ‘रईस’ विरूद्ध ‘सुल्तान’ हा सामना  रद्द झाला आहे. ‘रईस’ आता ईदला नाही तर पुढील वर्षी २६ जानेवारीला रिलीज होणार आहे. राहुल ढोलकिया दिग्दर्शित ‘ रईस’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट शाहरूखच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट तसेच फरहान अख्तर, रितेश सिधवानी यांच्या एक्स एंटरटेनमेंटची सहनिर्मिती आहे. निर्मात्यांनी आज ‘रईस’ची रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आल्याचे जाहिर केले. चित्रपटाची रिलीज लांबणीवर टाकणे हा निर्णय सोपा नव्हता. ‘रईस’कडून लोकांना बºयाच अपेक्षा आहेत. अशास्थितीत चित्रपटाचे योग्य प्रदर्शनही गरजेचे आहे. त्याचमुळे आम्ही ‘रईस’साठी २६ जानेवारी २०१७ ही रिलिज डेट निश्चित केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच आम्हाना सलमानसोबत बॉक्स आॅफिसवर संघर्ष नको, याचेही संकेत दिले. ‘रईस’ हा १९८० च्या दशकात गुजरातमधील एक  मद्य तस्कर रईस खान याची कथा आहे. ‘रईस’ने माघार घेतल्यामुळे यावर्षी ईदच्या मुहूर्तावर केवळ ‘सुल्तान’ रिलीज होणार हे स्पष्ट झालेय.‘सुल्तान’मध्ये सलमान पहेलवानाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: 'Rais' vs 'Sultan' match canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.