‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ फेम करिश्मा शर्माने सांगितला तिच्या पहिल्या किसचा अनुभव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 21:36 IST2017-10-25T16:06:26+5:302017-10-25T21:36:26+5:30

‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’मध्ये जबरदस्त इंटिमेट सीन देणाºया करिश्माने तिच्या पहिल्या किसचा अनुभव सांगितला आहे. वाचा तिने नेमके काय म्हटले.

'Ragini MMS Returns' Fame Karisma Sharma told her first experience! | ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ फेम करिश्मा शर्माने सांगितला तिच्या पहिल्या किसचा अनुभव !

‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ फेम करिश्मा शर्माने सांगितला तिच्या पहिल्या किसचा अनुभव !

र्माता एकता कपूर हिच्या आगामी ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ची अभिनेत्री करिश्मा शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. करिश्माच्या चर्चेचे कारण म्हणजे तिच्या पहिल्या किसचा अनुभव आहे. होय, करिश्मानेच तिचा हा पहिला अनुभव शेअर केला असून, त्यास तिने हा अनुभव खूपच मजेशीर असल्याचे म्हटले आहे. करिश्मा ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’मधून तिच्या करिअरला सुरुवात करीत आहे. या चित्रपटाच्या बोल्ड पोस्टर्समुळे करिश्मा अगोदरच चर्चेत आली असून, तिचे हे पोस्टर्स प्रचंड पसंत केले जात आहेत. अशात करिश्माने एका मुलाखतीत तिच्या पहिल्या किसचा अनुभव सांगितल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

मुलाखतीत पहिल्या किसचा अनुभव सांगताना करिश्माने सांगितले की, ‘हा अनुभव मी माझ्या पहिल्या कुठल्या तरी बॉयफ्रेंडसोबत घेतला आहे. आम्ही एकमेकांना पार्किंग एरियामध्येच किस केले होते. हा क्षण खूपच हॉट आणि कामुक होता.’ यावेळी करिश्माने तिच्या वेब मीडियममध्ये येण्याबाबतचाही खुलासा केला. तिने म्हटले की, ‘टीव्हीवर आपण स्किन शो करू शकत नाही. त्यामुळेच डीजिटल मीडियम झपाट्याने पुढे जात आहे. शिवाय या व्यासपीठावर आपण आपल्याला वाटेल त्या पद्धतीने दाखवू शकतो. माझ्या मते, हे एकमेव व्यासपीठ आहे ज्याठिकाणी अभिनेत्री, निर्माता आणि दिग्दर्शक स्वत:ला स्वत:च्या मनाप्रमाणे एक्स्प्रेस करू शकतो.’



एकता कपूरने जेव्हा या चित्रपटाचे हॉट पोस्टर शेअर करण्यास सुरुवात केली तेव्हापासून करिश्मा चर्चेत आली आहे. शिवाय तिच्या या वेबसिरीजच्या ट्रेलरने तर जबरदस्त धूम उडवून दिली असून, ट्रेलरमधील करिश्माचा बॉडी शो प्रेक्षकांना चांगलाच भावल्याचे दिसून येत आहे. या मुलाखतीत करिश्माला या वेबसिरीजबद्दल तिच्या परिवाराची काय प्रतिक्रिया आहे असे विचारले. त्यावर बोलताना करिश्माने म्हटले की, ‘ते खूपच सपोर्टिव्ह आहेत.’ करिश्माने ट्रेलरमध्ये जबरदस्त इंटीमेट सीन दिले आहेत. 

करिश्मा छोट्या पडद्यावरच एकता कपूरच्या ‘ये है मोहब्बते’ या मालिकेत निगेटिव्ह भूमिकेत झळकली आहे. याव्यतिरिक्त तिने ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘प्यार का पंचनामा २’ मध्ये काम केले आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून ती पहिल्यांदाच ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ या वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. या वेबसिरीजचा पहिला भाग २०११ मध्ये आला होता. 

Web Title: 'Ragini MMS Returns' Fame Karisma Sharma told her first experience!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.