RAEES MADNESS: सनी लिओनीच्या ‘लैला’वर लोकांचा थिएटरमध्ये धिंगाणा डान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 11:16 IST2017-01-27T05:37:01+5:302017-01-27T11:16:38+5:30

बऱ्याच वर्षांनंतर शाहरुख खानला ‘रईस’च्या माध्यमातून एक सुपरहिट चित्रपट मिळाला असे दिसतेय. आता किंग खानच्या एंट्रीवर त्याचे चाहते टाळ्या-शिट्ट्या ...

RAEES MADNESS: Sunny Leone's 'Laila' is a dancing dance in the theater! | RAEES MADNESS: सनी लिओनीच्या ‘लैला’वर लोकांचा थिएटरमध्ये धिंगाणा डान्स!

RAEES MADNESS: सनी लिओनीच्या ‘लैला’वर लोकांचा थिएटरमध्ये धिंगाणा डान्स!

्याच वर्षांनंतर शाहरुख खानला ‘रईस’च्या माध्यमातून एक सुपरहिट चित्रपट मिळाला असे दिसतेय. आता किंग खानच्या एंट्रीवर त्याचे चाहते टाळ्या-शिट्ट्या वाजवणार हे तर निश्चितच आहे पण कोणीच विचार केला नसेल कि चित्रपटात सगळ्यात जास्त टाळ्या-शिट्ट्या पडतील त्या सनी लिओनीला!

होय, सनीचे आयटम साँग ‘लैला मैं लैला’ हे गाणे सुरू होताच लोक खुर्च्यावर उभे राहून, पडद्यासमोर येऊन नाचू लागतात. संपूर्ण देशभरात विविध थिएटर्समधील असा ‘धिंगाणा डान्स’ पाहायला मिळत आहे. लोक सोशल मीडियावर व्हिडिओ काढून शेअर करीत आहेत.

सनीने स्वत: ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून आश्चर्य आणि आभार व्यक्त केले आहे. तिने लिहिले की, ‘अरे बाप रे! लोक तर अक्षरश: वेडे होऊन नाचताहेत, पैसे फेकताहेत. मला तर फार आनंद होतोय.’ आता सनीला कोण सांगणार की, असे फॅन केवळ भारतातच पाहायला मिळतील.
  जेव्हा पासून हे गाणे लाँच झाले आहे तेव्हापासून त्याची जादू लोकांवर पसरलेली आहे. सुरूवातीच्या काही दिवसांतच या गाण्याला यूट्यूबवर सर्वाधिक व्ह्युव्ज मिळाले. सगळीकडे हे गाणे ट्रेंडिंग होते. परंतु कोणीच विचार केला नव्हता की, चित्रपटगृहात हे गाणे एवढा धुमाकुळ घालेल. सनीचे आयटम नंबर सिनेमात घेण्याचा निर्मात्यांचा निर्णय सफल ठरला तर.
  ‘सैराट’मधील ‘झिंगाट’ गाण्यावर ज्या प्रमाणे लोक नाचत होते अगदी तशीच काहीशी मॅडनेस ‘लैला’ गाण्यासाठी दिसत आहे.  पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि नवाजुद्दिन सिद्दिकी हेदेखील ‘रईस’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हृतिक रोशनच्या ‘काबील’सोबत रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २० कोटींचा गल्ला जमवला.

तर येणाऱ्या काळात ही ‘लैला’ आणखी काय धिंगाणा घालले ते पाहायला मजा येईल ना! तुम्ही जर ‘रईस’ पाहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा की, तुम्हाला कसा वाटला?

Web Title: RAEES MADNESS: Sunny Leone's 'Laila' is a dancing dance in the theater!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.