Raees 2 On Cards : माहिरा खानने दिले ‘रईस २’ चे संकेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 16:42 IST2017-01-21T11:09:51+5:302017-01-21T16:42:38+5:30
शाहरूख खान आणि माहिरा खान हे दोघे सध्या ‘रईस’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. चित्रपटातील डायलॉग आणि गाणी यांना मिळणारी प्रसिद्धी ...
.jpg)
Raees 2 On Cards : माहिरा खानने दिले ‘रईस २’ चे संकेत!
श हरूख खान आणि माहिरा खान हे दोघे सध्या ‘रईस’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. चित्रपटातील डायलॉग आणि गाणी यांना मिळणारी प्रसिद्धी पाहता चाहत्यांमध्ये ‘रईस’ च्या प्रदर्शनाची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, ‘रईस’ रिलीज होण्याअगोदरच त्याच्या सिक्वेलची म्हणजेच ‘रईस २’ ची खमंग चर्चा ‘बी टाऊन’ मध्ये सुरू झालीय. सिक्वेल लवकरच येणार अशी माहिती पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने सोशल मीडिया साईटवरून तिचा ‘रईस’ मधील को-स्टार मोहम्मद झीशन अय्युब याला दिली आहे.
![]()
बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा चित्रपट आणि बॉक्स आॅफिसवर रिस्पॉन्स नाही, असे होईल का? नाही ना. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिला प्रथमच शाहरूख खानसोबत काम करायला मिळालेय त्यामुळे ती जाम खुश आहे. प्रदर्शनापूर्वीच ‘रईस’चे यश अनुभवताना माहिरा खानला ‘रईस २’ येणार असल्याची माहिती कळाली. लवकरच चित्रपटाचे स्क्रिप्ट आणि स्टारकास्ट ठरणार असून माहिरा खान ही सिक्वेलमध्ये असणार असल्याचे कळतेय. ‘रईस’ चित्रपटात माहिराने शाहरूख खानसोबत काम केल्याने आता तिला त्याच्यासोबत अभिनय
करण्याची गोडी निर्माण झाली आहे, असे दिसतेय.
![]()
फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी निर्मित ‘रईस’ चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी हे पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून चित्रपट २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. चित्रपट मागील वर्षी २५ जानेवारीला ईदच्या मुहूर्तावर सलमान खानच्या ‘सुल्तान’ सोबत रिलीज होणार होता. मात्र, बॉक्स आॅफिस टाळण्यासाठी निर्मात्यांनी जानेवारीत चित्रपट रिलीज करायचे ठरवले. आता हृतिक रोशनचा होम प्रोडक्शन असलेल्या ‘काबील’ चित्रपटासोबत रिलीज होणार आहे.