राधिका वापरणार ‘वर्चूअल रिअ‍ॅलिटी टेक्नॉलॉजी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 18:02 IST2016-05-04T12:32:40+5:302016-05-04T18:02:40+5:30

बहुगणी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच ‘फोबिया’ या चित्रपटात दिसणार आहे. एरोस इंटरनॅशनल व विकी रजानी निर्मित तसेच पवन कृपलानी ...

Radhika to use 'Virtual Reality Technology' | राधिका वापरणार ‘वर्चूअल रिअ‍ॅलिटी टेक्नॉलॉजी’

राधिका वापरणार ‘वर्चूअल रिअ‍ॅलिटी टेक्नॉलॉजी’

ुगणी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच ‘फोबिया’ या चित्रपटात दिसणार आहे. एरोस इंटरनॅशनल व विकी रजानी निर्मित तसेच पवन कृपलानी दिग्दर्शित या चित्रपटात राधिका एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ‘फोबिया’ एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. यात प्रथमच ‘वर्चुअल रिअ‍ॅलिटी टेक्नॉलॉजी’चा वापर करण्यात आला आहे. ‘वर्चुअल रिअ‍ॅलिटी टेक्नॉलॉजी’ एक कंम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे. याद्वारे वास्तविक व काल्पनिक गोष्टींचा आभास निर्माण केला जाऊ शकतो. आपण एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष आहोत आणि तिथे असलेल्या लोकांना स्पर्श करू शकतो, ऐकू शकतो, असे ही टेक्नॉलॉजी वापरणाºया व्यक्तिला जाणवते. या चित्रपटात राधिका अग्रोफोबियाने ग्रस्त तरूणीच्या भूमिकेत आहे. यासाठी फिल्ममेकर्सनी या टेक्नॉलॉजीचा वापर केलायं. 

Web Title: Radhika to use 'Virtual Reality Technology'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.