​टीव्हीची ‘बहू’ राधिका मदान बनणार विशाल भारद्वाज यांची ‘हिरोईन’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 10:26 IST2018-04-09T04:55:00+5:302018-04-09T10:26:13+5:30

छोट्या पडद्यावरच्या अनेक सेलिब्रिटींना बॉलिवूडची लॉटरी लागली. आता यात आणखी एक नाव जोडले गेले आहे.   हे नाव कुठले तर ...

Radhika Madan to become TV's 'Bahu', Vishal Bhardwaj's 'Heroine'! | ​टीव्हीची ‘बहू’ राधिका मदान बनणार विशाल भारद्वाज यांची ‘हिरोईन’!

​टीव्हीची ‘बहू’ राधिका मदान बनणार विशाल भारद्वाज यांची ‘हिरोईन’!

ट्या पडद्यावरच्या अनेक सेलिब्रिटींना बॉलिवूडची लॉटरी लागली. आता यात आणखी एक नाव जोडले गेले आहे.   हे नाव कुठले तर राधिका मदान हिचे. राधिका मदान हिला आपण ‘मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकेत पाहिले असेलच. या मालिकेने राधिका घराघरात पोहोचली. आता राधिकाने बॉलिवूडची तयारी चालवली आहे.  ज्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात संधी मिळावी म्हणून बडे बडे स्टार प्रतीक्षा करतात,अशा दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी राधिकाला मिळाली आहे. होय, दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटातून राधिका बॉलिवूड डेब्यू करतेय. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘छुरियां’ या कॉमेडी चित्रपटात राधिका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
राधिकाचा बॉलिवूडशी कुठलाही संबंध नाही. म्हणजेचं, तिने अतिशय संघर्षाने स्वबळावर अभिनय क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.  ‘छुरियां’ हा चित्रपटही राधिकाला याच मेहनतीच्या जोरावर मिळाला. या चित्रपटासाठी ६० मुलींचे आॅडिशन घेतले गेले होते. यातून राधिकाची निवड झाली. आपल्या प्रतिभेच्या जोरावर राधिकाने ही भूमिका आपल्या खिशात टाकली. विशाल भारद्वाज हे सुद्धा राधिकाची प्रतिभा पाहून चांगलेच प्रभावित झालेत. आम्हाला या भूमिकेसाठी जशी अभिनेत्री हवी होती, राधिका एकदम तशीच आहे. या भूमिकेच्या चौकटीत ती अगदी फिट बसते, असे ते म्हणाले. एकंदर काय तर राधिका आपल्या पहिल्या परिक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालीय.या परिक्षेने एक संधी राधिकाला दिली आहे. आता राधिका या संधीचे किती सोने करते, ते बघूच. तूर्तास राधिका या चित्रपटाच्या तयारीत बिझी आहे.  
‘छुरियां’त राधिका ‘दंगल’ फेम सान्या मल्होत्रासोबत दिसणार आहे. या चित्रपटात दोघीही बहीणींच्या भूमिकेत दिसतील. हा चित्रपट राजस्थानात राहणाºया दोन बहीणींची कथा आहे. या दोन्ही बहिणींचे लग्नाआधीचे आणि लग्नानंतरचे आयुष्य यात दिसणार आहे. या चित्रपटासाठी सान्या आणि राधिका दोघींनाही १० ते १२ किलो वजन वाढवावे लागणार आहे. चालू महिन्याच्या अखेरिस या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल.

Web Title: Radhika Madan to become TV's 'Bahu', Vishal Bhardwaj's 'Heroine'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.