राधिका आपटेचे स्टनिंग Photoshoot,दिसला Bold अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2017 16:34 IST2017-03-17T11:04:15+5:302017-03-17T16:34:15+5:30

बॉलिवूड आणि मराठीच नाहीतर जगभरातील रसिकांची मनं जिकंणारी मराठीमोळी अभिनेत्री राधिका आपटेची प्रत्येक अदा जितकी रसिकांना घायाळ करणारी असते. ...

Radhika Apte's stunning photoshoot, seen Bold guess | राधिका आपटेचे स्टनिंग Photoshoot,दिसला Bold अंदाज

राधिका आपटेचे स्टनिंग Photoshoot,दिसला Bold अंदाज

लिवूड आणि मराठीच नाहीतर जगभरातील रसिकांची मनं जिकंणारी मराठीमोळी अभिनेत्री राधिका आपटेची प्रत्येक अदा जितकी रसिकांना घायाळ करणारी असते. राधिका पुन्हा एकदा बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाजात फोटोशूट केले आहे. या फोटोशूट राधिका रिव्हिलिंग ट्युब टॉपमध्ये दिसतेय.तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर राधिका फोटो व्हायरल झाला आहे.सध्या अक्षय कुमारसह राधिका पॅडमॅन सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.महेश्वर येथील अनेक सुंदर लोकेशन्सवर अक्षय आणि राधिका सिनेमाचे शूटिंग एन्जॉय करतायेत.आपली बिनधास्त आणि बेधडक मतं मांडण्यात मागंपुढे न बघणारी अभिनेत्री म्हणून राधिका आपटे हिच्याकडे पाहिले जाते. नुकतेच तीने “सेक्स ही विकाऊ गोष्ट आहे कारण आजही त्याकडे वर्ज्य म्हणून पाहिले जाते.''असे म्हटले होते.

तसेच पार्च्ड या सिनेमामुळेही तिच्यावर टीका करण्यात आली होती.अंगप्रदर्शन किंवा एक्स्पोझ करण्यात काहीही वावगं नसल्याचे अभिनेत्री राधिका आपटे हिनं सांगितले होते. पार्च्ड सिनेमात दिलेल्या बोल्ड सीनमुळे राधिका खूप चर्चेत आली होती. याबद्दल विचारलं असता हा इंटिमेट सीन भूमिकेची गरज असल्याचं तिनं स्पष्ट केले होते. सेन्सॉर बोर्डाच्या निर्देशानंतर सीन ब्लर करण्यात आल्याचंही तिनं सांगितलंय. हे व्हायला नको होतं असंही तिनं म्हटलंय. भारतात कामसूत्र सारखा सिनेमा बनवला गेला, तरीही अंगप्रदर्शनाचा विषयाला महत्त्व दिलं जात असल्याबद्दल तिनं नाराजी व्यक्त केलीय. शिवाय भारतात असे बोल्ड सिनेमा बनवणं ही काळाची गरज असून कलाकार म्हणून अंगप्रदर्शनात काहीही गैर नाही असे राधिकानं म्हटले होते. राधिका रजनी कांतसह 'कबाली' या तामिळ सिनेमातही झळकली होती. 

Web Title: Radhika Apte's stunning photoshoot, seen Bold guess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.