​राधिका आपटेचे फेसबुक अकाऊंट झालेयं हॅक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 11:03 IST2017-08-27T05:30:20+5:302017-08-27T11:03:56+5:30

शनिवारी भारतात फेसबुक सुमारे तासभर ठप्प पडले होते. कम्प्युटर आणि मोबाईलवर फेसबुकचा वेग प्रचंड मंदावला होता. याचदरम्यान अभिनेत्री राधिका ...

Radhika Apte's facebook account hacked! | ​राधिका आपटेचे फेसबुक अकाऊंट झालेयं हॅक !

​राधिका आपटेचे फेसबुक अकाऊंट झालेयं हॅक !

िवारी भारतात फेसबुक सुमारे तासभर ठप्प पडले होते. कम्प्युटर आणि मोबाईलवर फेसबुकचा वेग प्रचंड मंदावला होता. याचदरम्यान अभिनेत्री राधिका आपटे हिचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले होते. स्वत: राधिकाने tweet करून याची माहिती दिली.माझे फेसबुक अकाऊंट पुन्हा एकदा हॅक झाले आहे. प्लीज, मॅसेंजरवर मॅसेज करू नका, असे tweet तिने केले.
 शनिवारी फेसबुक लॉगइन केल्यावर ‘फेसबुक डाऊन’चा मॅसेज येत होता. कुठलीही पोस्ट शेअर केल्यावर ‘आम्ही आपली पोस्ट अपडेट करण्यास असमर्थ आहोत,’ असा मॅसेज पाहायला मिळत होता. यातच राधिकाला वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागले.
आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी राधिका सध्या ‘बाजार’ या चित्रपटात बिझी आहे. यात ती बॉलिवूडचा ‘नवाब’ सैफ अली खान याच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय राधिका सैफ आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत एका टीव्ही सीरिजमध्येही ती दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर प्रसारित केल्या जाणा-या या टीव्ही सीरिजमध्ये राधिका एका रॉ एजंटच्या भूमिकेत दिसेल.
 
ALSO READ :  ‘हा’ बोल्ड सीन्स शूट करण्यासाठी राधिका आपटे अन् आदिल हुसैनने केली रात्रभर रिहर्सल!

२००५ मध्ये राधिकाने ‘वाह, लाईफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले होते. यानंतर शोर इन द सिटी, कबाली, बदलापूर, मांझी- द माऊंटेन मॅन अशा अनेक चित्रपटांत राधिका दिसली आहे. हिंदी चित्रपटांशिवाय राधिकाने मराठी, तेलगू, तामिळ, मल्याळम चित्रपटातही काम केलेय. राधिकाची गणना मेनस्ट्रीम सिनेमाच्या टॉप मोस्ट अभिनेत्रींमध्ये होत नसली तरी तिची एक वेगळी फॅन फॉलोर्इंग आहे. दमदार अभिनयासाठी राधिका ओळखली जाते. तशीच एक बोल्ड अ‍ॅक्ट्रेस अशीही तिची ओळख आहे. तिच्या अनेक बोल्ड फोटोशूट आणि सीन्सवर वादंग माजले होते.

Web Title: Radhika Apte's facebook account hacked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.