राधिका आपटे म्हणते, 'यशाचं शिखर अद्याप गाठायचे बाकी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 20:00 IST2019-03-18T20:00:00+5:302019-03-18T20:00:00+5:30
राधिका यशाच्या शिखरावर असताना देखील ती अद्याप यशाचे शिखर गाठायचे असल्याचे सांगते.

राधिका आपटे म्हणते, 'यशाचं शिखर अद्याप गाठायचे बाकी'
बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे गेल्या वर्षी 'घुल', 'लस्ट स्टोरीज', 'सेक्रेड गेम्स' यांसारख्या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकली. या वेबसीरिजमधील तिच्या कामाचे खूप कौतूक झाले. याशिवाय 'पॅडमॅन', 'अंधाधून' या तिच्या सिनेमांनी देखील बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली. राधिका यशाच्या शिखरावर असताना देखील ती अद्याप यशाचे शिखर गाठायचे असल्याचे सांगते.
राधिका आपटेने पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'मला टॉप स्टारसोबत काम करायला आवडते. मग ती महिला असो किंवा पुरूष. माझी यशाची व्याख्या इतरांपेक्षा वेगळी आहे. मी ठरवलेले ध्येय अजूनही साध्य झालेले नाही. त्यामुळे माझ्यासाठी यशाचे शिखर अजूनही लांब आहे. '
राधिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत 'रात अकेली है' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हनी त्रेहान करणार आहे. या चित्रपटाबाबत राधिका खूप उत्सुक आहे.
तिने नवाजुद्दीन उत्तम अभिनेता असून त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मी खूप खूश असल्याचे सांगितले व पुढे म्हणाली की, ''रात अकेली है' या चित्रपटात माझी भूमिकादेखील खूप छान आहे. महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटाची स्क्रीप्ट खूप चांगली असून त्यात काम करायला मिळते आहे, त्यामुळे मी खूश आहे.'
राधिका आपटे व नवाजुद्दीन सिद्दीकी या दोघांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.