मेहुणीसोबत अफेअर, बायकोने नवऱ्याचा काट्याने काटा काढला! पोलिसालाही सोडलं नाही; ओटीटीवरचा 'हा' सिनेमा पाहिलाय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 18:02 IST2026-01-06T18:01:49+5:302026-01-06T18:02:20+5:30
सध्या एका अशा सिनेमाची चर्चा आहे. ज्याची नायिका प्रेक्षकांना हादरवून सोडते. राधिका आपटेच्या या सिनेमाची कथा लव्ह ट्रँगलवर आधारित असली तरी शेवटपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवते.

मेहुणीसोबत अफेअर, बायकोने नवऱ्याचा काट्याने काटा काढला! पोलिसालाही सोडलं नाही; ओटीटीवरचा 'हा' सिनेमा पाहिलाय का?
लव्ह ट्रँगल आणि त्यातून झालेला खून या विषयावर अनेक सिनेमे आणि वेब सीरिज ओटीटीवर उपलब्ध आहेत. पण, सध्या एका अशा सिनेमाची चर्चा आहे. ज्याची नायिका प्रेक्षकांना हादरवून सोडते. 'साली मोहोब्बत' हा सिनेमा अलिकडेच ओटीटीवर प्रदर्शित झालेला आहे. राधिका आपटेच्या या सिनेमाची कथा लव्ह ट्रँगलवर आधारित असली तरी शेवटपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवते.
सिनेमाची सुरुवात ही घरात सुरू असलेल्या एका पार्टीपासून होते. या सिनेमाची नायिका पार्टीत सगळ्यांना भरपेट खाऊ घालत असल्याचं दिसत आहे. पण त्याच वेळी नवऱ्याला ती त्याच्या मैत्रिणीसोबत त्याच घरातील रुममध्ये फ्लर्ट करताना रंगेहाथ पकडते. आणि मग सुरू होते सिनेमाची खरी कथा. नवऱ्याला रंगेहाथ पकडल्यावर ती कोणताच तमाशा करत नाही तर ती हॉलमध्ये येऊन सगळ्यांना एक हादरवून टाकणारी कथा ऐकवते. ही कथा असते एका छोट्याशा गावात राहणाऱ्या स्मितीची जिचं जग म्हणजे तिचा पती आणि झाडं...
पण, स्मिताच्या आयुष्यात एक वादळ येतं. झाडांवर आणि स्वत:च्या नवऱ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या स्मिताला मात्र नवऱ्याचं मेहुणीसोबत अफेअर असल्याचं कळतं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. पण, ती साधी भोळी दिसणारी स्मिता खूपच हुशार असते. तिच्या साधेभोळे पणातच सगळं रहस्य दडलं आहे. मेहुणीसोबत अफेअर करणाऱ्या नवऱ्याचा ती काट्याने काटा काढते. या कानाची खबर त्या कानाला कळू देत नाही. मात्र या खूनाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला तिचं सत्य समजतं आणि तो तिला ब्लॅकमेल करू लागतो. त्यानंतर मग स्मिता काय करते. पोलिसाचं तोंड कसं बंद करते, या सिनेमाचा शेवट कसा होतो? हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल.
या सिनेमात राधिका आपटे मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात साधी भोळी दिसणारी राधिका तिच्या अभिनयाने मात्र चार चांद लावते. दिव्येंदु, कुशा कपिला, अनुराग कश्यप, लेखा प्रजापती, शरत सक्सेना यांच्या मुख्य भूमिका सिनेमात आहेत. 'साली मोहोब्बत' हा सिनेमा झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १२ डिसेंबरला प्रदर्शित करण्यात आला आहे. टिस्का चोप्राने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.