राधिका आपटेचा थ्रिलर 'साली मोहब्बत' थेट OTT वर येतोय, कधी आणि कुठे पाहता येईल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 14:49 IST2025-11-27T14:49:26+5:302025-11-27T14:49:55+5:30
हा एक संपूर्ण रहस्य, सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला चित्रपट आहे.

राधिका आपटेचा थ्रिलर 'साली मोहब्बत' थेट OTT वर येतोय, कधी आणि कुठे पाहता येईल?
बहुप्रतिक्षित आणि चर्चेत राहिलेला साली मोहब्बत' हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या येतोय. थिएटरऐवजी हा चित्रपट थेट ओटीटीवर रिलीज होणार आहे. घरबसल्या थरारक चित्रपट पाहायला मिळणार असल्यानं चाहते आनंदी झाले आहेत. अलिकडेच ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता. त्यावेळी समीक्षकांनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला होता. तसेच शिकागो साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळालाय.
'साली मोहब्बत' हा एक संपूर्ण रहस्य, सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला चित्रपट आहे. त्याची कथा इतकी जबरदस्त आहे की, एकदा पाहायला सुरुवात केल्यावर शेवटपर्यंत तुम्हाला जागेवरून उठू देणार नाही. तब्बल एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. 'साली मोहब्बत' हा चित्रपट १२ डिसेंबर २०२५ पासून Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होईल.
'साली मोहब्बत' या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात बॉलिवूडमधील काही दमदार कलाकार एकत्र आले आहेत. 'थ्रिलर क्वीन' म्हणून ओळखली जाणारी राधिका आपटे यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. 'मिर्झापूर' फेम दिव्येंदु शर्मा, अनुराग कश्यप यात अभिनय करताना दिसणार आहेत. तसेच चाहत अरोरा, कुशा कपिला आणि शरत सक्सेना यासारखे कलाकारही यात आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेत्री टिस्का चोप्रा यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती मनीष मल्होत्रा आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे.