आपल्या आगामी चित्रपटासाठी आर. माधवनने केला लूक चेंज ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 13:37 IST2017-09-04T08:00:51+5:302017-09-04T13:37:42+5:30

बॉलिवूड अभिनेता आर. माधवन तीन आठवड्या पूर्वी केलेले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. माधनव फोटो शेअर करताच जवळपास ...

R for your upcoming movie. Madhavan did change the look? | आपल्या आगामी चित्रपटासाठी आर. माधवनने केला लूक चेंज ?

आपल्या आगामी चित्रपटासाठी आर. माधवनने केला लूक चेंज ?

लिवूड अभिनेता आर. माधवन तीन आठवड्या पूर्वी केलेले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. माधनव फोटो शेअर करताच जवळपास 1 लाख फॅन्सने त्याला लाईक केले आहे. तर काही शेअरसुद्धा केले आहे. माधनवने शेअर केलेल्या या फोटोत हलकीशी दाढी ठेवली आहे. याफोटोला त्यांने एक कॅप्शनसुद्धा केले आहे. माझा मित्र मनोज जाधवने हे आठवड्या पूर्वी केले आहे. कोल्हापूरमध्ये हे फोटोशूट करण्यात आले आहे. माधवनने नुकतेच त्याचे वजनदेखील कमी केले आहे. 

हा लूक त्याचा 'विक्रम वेधा' या त्याच्या आगामी चित्रपटातील लूक आहे. या चित्रपटात माधवन एका एनकाऊंटर स्पेशालिस्टच्या भूमिकेत आहेत. तर विजय सेतुपती एका गँगस्टरच्या रोलमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर माधवन सुशांत सिंग राजपूतच्या चंदा मामा दूर के मध्ये  महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट एका टीमवर आधारित आहे ज्यांच्या एका मोहीमेमुळे संपूर्ण देश एकत्र येतो. एका इंटरव्ह्यु दरम्यान माधवन म्हणाला की, ''हा चित्रपट तो आपल्या मुलाला दाखवण्यासाठी उत्सुक आहे. मला आशा आहे की हा चित्रपट बघितल्यानंतर त्याला माझ्यावर गर्व असेल.''  




ALSO READ : birthday special : ​तुमच्या लाडक्या ‘मॅडी’चा आज वाढदिवस; पाहा, त्याची काही लोकप्रीय गाणी! 

शेवटचा माधवन साला खेडूस या चित्रपटात दिसला होता. याचित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. याचित्रपटाव्दारे रितिक सिंगने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. माधवनकडे सध्या सात चित्रपट आहेत त्यापैकी तीन हिंदी आणि चार साऊथचे चित्रपट आहेत. माधवनने आपले 11 किलो वजन कमी केले आहे. चंदा मामा दूर के साठी त्यांने वजन कमी केले आहे. यासाठी सुशांतने नासाला जाऊन ट्रेनिंगसुद्धा घेतले आहे. आर. माधवन ही नासाला जाऊन ट्रेनिंग घेणार आहे.    
   

Web Title: R for your upcoming movie. Madhavan did change the look?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.