ए. आर. रहमानने म्हटले, लोकांच्या टीकांकडे सकारात्मकपणे बघतो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 21:58 IST2017-09-10T16:28:47+5:302017-09-10T21:58:47+5:30
‘लोकांच्या टीकांचा सामना करणे प्रत्येक कलाकाराच्या प्रवासाचा एक भाग आहे.’ हे मत ग्रॅमी आणि आॅस्कर पुरस्कार विजेता भारतीय संगीतकार ...

ए. आर. रहमानने म्हटले, लोकांच्या टीकांकडे सकारात्मकपणे बघतो!
‘ ोकांच्या टीकांचा सामना करणे प्रत्येक कलाकाराच्या प्रवासाचा एक भाग आहे.’ हे मत ग्रॅमी आणि आॅस्कर पुरस्कार विजेता भारतीय संगीतकार ए. आर. रहमान याने व्यक्त केले आहे. ‘मद्रास का मोजार्ट’ असे म्हटले जात असलेल्या रहमानने सांगितले की, ‘लोकांच्या टीकांचा स्वीकार करून पुढे जाणे हा माझ्या संगीत प्रवासाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. यामुळे मला माझ्यात सकारात्मक बदल करून घेण्यास आणि पुढे जाण्यास मदतच झाली आहे. आपल्या यशस्वीतेचा प्रवास कथन करताना रहमानने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘मी आतापर्यंत लोकांच्या टीकांकडे सकारात्मक पद्धतीने बघत आलो आहे. यामुळे मला माझ्या नव्या प्रोजेक्टसाठी आणि पुढील शो आणखी चांगले करण्यासाठी एकप्रकारची मदतच लाभली आहे.’
काही दिवसांपूर्वीच ए. आर. रहमान यांनी सामाजिक कार्यकर्त्या तथा पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध नोंदविताना ‘हा माझा भारत नाही’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती. रहमानच्या या प्रतिक्रियेनंतर सर्वत्र वादंग निर्माण झाले होते. विशेषत: सोशल मीडियावर रहमानच्या या प्रतिक्रियेचा चांगलाच समाचार घेण्यात आला. काहींनी रहमानची बाजू लावून धरली तर काहींनी त्याच्यावर चौफेर टीका केली. याच अनुषंगाने रहमानने आता वक्तव्य केले असून, तो याकडे सकारात्मक पद्धतीने बघत असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
ALSO READ : ए. आर. रहमानने केले धक्कादायक वक्तव्य; म्हटले, ‘हा माझा भारत नाही’!
१९९२ मध्ये ‘रोजा’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाºया रहमानने संगीत दुनियेत स्वत:चे असे बळकट स्थान निर्माण केले आहे. रहमान म्हणतोय की, ‘विभिन्न संगीत तत्त्वांना जोडून मी माझी शैली विकसित केली आहे. ज्यामध्ये पृथ्वीवरील बºयाचशा शास्त्रीय आणि समकालीन आवाजांचा सहभाग आहे.’ वास्तविक रहमानच्या संगीताने बॉलिवूडमधील संगीताचा आवाज बदलला आहे. रहमानच्या संगीताची दखल केवळ भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. २०१० मध्ये त्याला ग्रॅमी या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही बाब सर्व भारतीयांना गौरावांकित करणारी आहे.
रहमानचा बॉलिवूडमधील प्रवास पाहता त्याच्या आयुष्यावर आगामी काळात ‘बायोपिक’ बनविली जाण्याची जोरदार चर्चा रंगत आहे. काही दिवसांपूर्वीच इम्तियाज अली यांनी याविषयी आपले मत व्यक्त केले होते. रहमानवर बायोपिकची निर्मिती व्हायलाच हवी, परंतु ही योग्य वेळ नाही. कारण रहमान यांना त्यांच्या करिअरमध्ये आणखी बरेच काही करायचे असल्याचे इम्तियाज अली यांनी म्हटले होते.