R Madhavan : सर, तुमचा हा फोटो Delete करा, माझी बायको...; आर माधवनला चाहत्याची कळकळीची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 09:43 AM2023-03-01T09:43:28+5:302023-03-01T09:44:33+5:30

५२ वर्षीय माधवन तरुणींमध्ये आजही लोकप्रिय आहे.

R Madhavan shares shower selfie on social media husband says please delete it as my wife is still staring at your pic | R Madhavan : सर, तुमचा हा फोटो Delete करा, माझी बायको...; आर माधवनला चाहत्याची कळकळीची विनंती

R Madhavan : सर, तुमचा हा फोटो Delete करा, माझी बायको...; आर माधवनला चाहत्याची कळकळीची विनंती

googlenewsNext

R Madhavan :  'रहना है तेरे दिल मे' सिनेमातील 'मॅडी'ची भूमिका साकारणारा 'आर माधवन' पन्नाशीतही त्याच्या लुक्स आणि फिटनेसने तरुणाईला घायाळ करतोय. ५२ वर्षीय माधवन आजही तरुणींचा चाहता आहे. त्याने पोस्ट केलेल्या एका सेल्फीमुळे तर तरुणी लाडक्या 'मॅडी' च्या प्रेमातच पडल्या आहेत. आता हेच बघा ना त्याच्या सेल्फीकडे महिला अशी काही बघत राहिली की तिच्या पतीने थेट माधवनकडे तक्रारच केली आहे. 

त्याचं झालं असं की माधवनने इन्स्टाग्रामवर अंघोळ करुन आल्यानंतरचा एक सेल्फी पोस्ट केला. त्याचा हा लुक चाहत्यांना प्रचंड आवडला. या फोटोवर चाहत्यांनी बऱ्याच कमेंट्स केल्या. 'नक्कीच आगामी प्रोजेक्टमध्ये पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत असणार' अशी कमेंट एकाने केली. 'याचं वय तर  कमीच होत चाललंय', 'चोको बॉय' अशाही कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. यात एका कमेंटने मात्र लक्ष वेधून घेतलंय. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले, 'सर कृपया हा फोटो डिलीट करा...माझी पत्नी अजुनही फोटोकडेच टक लावून बघत आहे.'

चाहत्यांची ही प्रांजळ विनंती वाचून हसू आवरत नाही. 'मॅडी' खरोखरच या वयातही असा काही हॅंडसम दिसतोय की महिलाही त्याच्या फोटोकडे बघता आहेत.

यानंतर माधवनने स्वत:च या फोटोमागची खरी गोष्ट काय ते सांगितले आहे. मॅडी म्हणाला,'लोकांनी वाटतं तितका खरंच मी फिट असतो तर बरं झालं असतं पण मी आता ५० वर्षांचा आहे. मला वाटतं अनिल कपूर माझ्यापेक्षा जास्त फिट आहे. ते फारच मस्त आहेत. पण माझ्या फोटोंवरुन माझी पत्नी नेहमी मला बोलते. ती माझी खिल्ली उडवते. मी तो फोटो मुद्दामुन पोस्ट केलाच नसता. खरं तर माझं वजन वाढलंय की कमी झालंय यावरुन सरिता आणि माझ्यात भांडणं सुरु असतात. मला आठवतं मी चेन्नईमध्ये शूटिंग करत होतो. तेव्हा माझं वजन कमी झाल्याचं मी तिला सांगितलं. पण तिला विश्वासच बसला नाही. म्हणून मी तो फोटो तिला पाठवला.'

माधवन पुढे म्हणाला,' नंतर मला माहित नाही मी तो फोटो शॉवर सेल्फी म्हणून सोशल मीडियावर का पोस्ट केला. नंतर तो फोटो खूप व्हायरल झाला आणि आम्हाला दोघांनाच हे बघून लाज वाटली. हे प्लॅन करुन व्हायला हवं होतं पण ते अचानक झालं.'

माधवन दिवसेंदिवस तरुणच दिसत आहे अशी कमेंट चाहते त्याच्या नवीन पोस्टवर करताना दिसत आहेत. माधवनने त्याच्या आगामी प्रोजेक्टमीळ लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. नवीन प्रोजेक्टसाठी खूप उत्साहित असल्याचं त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 

'रहना है तेरे दिल मे','३ इडियट्स', रंग दे बसंती, 'रॉकेटरी' अशा अनेक सिनेमांमधून त्याच्या अभिनयाने चाहत्यांना प्रेमातच पाडले आहे. माधवनचा सिनेमा येणार म्हणल्यावर चाहतेही तेवढेच उत्सुक असतात.

Web Title: R Madhavan shares shower selfie on social media husband says please delete it as my wife is still staring at your pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.