‘या’ अंदाजात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटली बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 14:12 IST2018-03-20T08:42:19+5:302018-03-20T14:12:19+5:30
बॉलिवूडची ‘बेफिक्रे’ अभिनेत्री कंगना राणौत हिच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले असतानांच कंगनाचे काही ताजे फोटो समोर आले आहेत. ...
.jpg)
‘या’ अंदाजात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटली बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत!
ब लिवूडची ‘बेफिक्रे’ अभिनेत्री कंगना राणौत हिच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले असतानांच कंगनाचे काही ताजे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये कंगना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसतेय. साहजिकच राजकीय प्रवेशाच्या चर्चेदरम्यान कंगनाने अचानक पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. अर्थात ही भेट ‘राजकीय’ नव्हती, हे आधीच स्पष्ट करायला हवे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात कंगनाला पंतप्रधानांशी भेटण्याची संधी मिळाली.
![]()
यावेळी कंगना मोदींशी हस्तांदोलन करताना दिसली. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी हेही याप्रसंगी हजर होते. कंगना मोदींची खूप मोठी फॅन आहे, हे आपल्याला ठाऊक आहेच. त्यामुळे मोदींशी भेटताना कंगनाच्या चेहºयावर आनंद लपता लपत नव्हता.पांढºया साडीतील कंगनाचे सौंदर्य त्यामुळे आणखीच खुलून आले होते.
![]()
ALSO READ : कंगना राणौत म्हणते, लोक मला ‘सायको’ म्हणायचे, ‘या’ चित्रपटाने दूर होईल त्यांचा गैरसमज!
गेल्या काही दिवसांपासून कंगना राणौत राजकारणात येणार, अशा बातम्या कानावर येत आहेत. अद्याप कंगना यावर उघड बोललेली नाही. पण ताज्या इव्हेंटमध्ये कंगना मोदींची जोरदार प्रशंसा करताना दिसली होती. मी नरेंद्र मोदी यांची खूप मोठी फॅन आहे. मी खूप पेपर वाचत नाही. पण नरेंद्र मोदी एक सक्सेस स्टोरी आहेत. एक चहावाला आज देशाचा पंतप्रधान आहे. अर्थात हा त्यांचा नाही तर देशाच्या लोकशाहीचा विजय आहे. जग कधीच परफेक्ट असू शकत नाही. पण आपण त्याना बॅलेन्स करू शकतो, असे कंगना म्हणाली होती. मला राजकारणात येण्यास काहीही अडचण नाही. पण मला नेत्यांचा फॅशन सेन्स आवडत नाही. मला माझ्या ग्लॅमरसह राजकारणात स्वीकारण्यास लोक तयार असतील तर मी राजकारण येऊ शकते, असेही ती म्हणाली होती.
तूर्तास कंगना ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात बिझी आहे. अर्थात अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट आलेली नाही. आधी हा चित्रपट यावर्षी एप्रिलमध्ये येणार, अशी खबर होती. पण मध्यंतरी या ऐतिहासिक चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची खबर आली. याशिवाय ‘मेंटल है क्या’ हा आणखी एक चित्रपट कंगना घेऊन येणार आहे. यात तर राजकुमार रावसोबत दिसणार आहे.