​‘रईस’ ला टक्कर देणार का ‘काबील’चे नवे ट्रेलर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 11:21 IST2016-12-20T11:21:49+5:302016-12-20T11:21:49+5:30

Hrithik Roshan and Yami Gautam’s Kaabil trailer 2 : Kaabil : ‘रईस’ला टक्कर देण्यासाठी ‘काबील’च्या मेकर्सनी आपल्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन चालवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज मंगळवारी ‘काबील’चे नवे ट्रेलर जारी करण्यात आले. ‘काबील’चे हे नवे ट्रेलर निश्चितपणे चाहत्यांसाठी एक ट्रिट आहे.iler 2 :

Qabil's new trailer to hit 'Rais'? | ​‘रईस’ ला टक्कर देणार का ‘काबील’चे नवे ट्रेलर?

​‘रईस’ ला टक्कर देणार का ‘काबील’चे नवे ट्रेलर?

परस्टार हृतिक रोशन याची मुख्य भूमिका असलेला ‘काबील’ सध्या चांगलाच चर्चेत आहे, तो बॉक्स आॅफिसवर रंगणार असलेल्या संघर्षामुळे. शाहरूख खानचा ‘रईस’ आणि हृतिकचा ‘काबील’ एकाच दिवशी बॉक्सआॅफिसवर झळकणार आहेत. ‘रईस’ला टक्कर देण्यासाठी ‘काबील’च्या मेकर्सनी आपल्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन चालवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज मंगळवारी ‘काबील’चे नवे ट्रेलर जारी करण्यात आले. ‘काबील’चे हे नवे ट्रेलर निश्चितपणे चाहत्यांसाठी एक ट्रिट आहे.

या नव्या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा हृतिक व यामीची दमदार केमिस्ट्री पाहायला मिळतेय. शिवाय तेवढेच दमदार डायलॉगही आहेत. या ट्रेलरसोबतच हृतिक रोशनने चित्रपटाचे दोन नवे पोस्टर्स शेअर केले आहेत. या पोस्टर्समध्ये हृतिक आणि यामी गौतम हे दोघेही दिसत आहे. यातील दोघांची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे.
आधी ‘काबील’ आणि ‘रईस’ हे दोन्ही चित्रपट येत्या २६ जानेवारीला बॉक्स आॅफिसवर धडकणार होते. मात्र यानंतर ‘काबील’ व  ‘रईस’च्या मेकर्सनी त्यांचा चित्रपट एक दिवस आधी म्हणजे २५ जानेवारीला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. आता एकाच दिवशी बॉक्सआॅफिसवर झळकणाºया या दोन्ही चित्रपटांपैकी कोण बाजी मारतो, ते लवकरच कळेल. तोपर्यंत तरी ‘काबील’चा नवा ट्रेलर पाहायला हवा.


 ‘काबील’मध्ये हृतिक रोशन, यामी गौतम यांच्यासोबत रोहित आणि रोनित रॉय यांच्या मुख्य भूमिका आहेत.  संजय गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटाला राजेश रोशन यांनी संगीत दिले आहे. उर्वशी रौतेला हिचा एक हॉट परफॉर्मन्सही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा एका जोडप्याची आहे. जे पाहू शकत नाही. यामीने हृतिकच्या प्रेयसीची आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने हृतिक व यामी ही जोडी प्रथमच आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.

{{{{twitter_post_id####}}}}


{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Qabil's new trailer to hit 'Rais'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.