Pushpa 2 Teaser: अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली..! जेलमधून फरार झाला 'पुष्पाराज', पाहा 'पुष्पा २'ची पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 12:38 PM2023-04-05T12:38:44+5:302023-04-05T12:39:03+5:30

Pushpa 2 : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर फिल्म पुष्पा २ची पहिली झलक समोर आली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी या चित्रपटाची झलक शेअर केलीय.

Pushpa 2 Teaser: Finally fans wait is over..! 'Pushparaj' escaped from jail, watch the first glimpse of 'Pushpa 2' | Pushpa 2 Teaser: अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली..! जेलमधून फरार झाला 'पुष्पाराज', पाहा 'पुष्पा २'ची पहिली झलक

Pushpa 2 Teaser: अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली..! जेलमधून फरार झाला 'पुष्पाराज', पाहा 'पुष्पा २'ची पहिली झलक

googlenewsNext

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर फिल्म 'पुष्पा २' (Pushpa 2)ची वाट पाहत असलेल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर फिल्म पुष्पा २चा पहिला टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये दिग्दर्शक सुकुमार यांनी पुष्पराजची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. रिलीज झालेल्या टीझरमध्ये 'पुष्पा' तिरुपती तुरुंगातून फरार असल्याचे दाखवण्यात आले आहे. पोलिस कोणाच्या शोधात गुंतले असून शहरात दंगलीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पण याच दरम्यान दिग्दर्शक सुकुमारने आणखी एक मोठा इशारा दिला आहे.

टीझरमध्ये निर्मात्यांनी स्पष्ट केले की, हा प्रवास अजून संपणार नाही. पुष्पा राजचा शोध सुरू झाला आहे पण त्याची आणखी एक झलक लवकरच पाहायला मिळणार आहे. रिलीज झालेल्या टीझरमध्ये, निर्मात्यांनी स्पष्ट केले की पुष्पा २चा पुढील टीझर अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या संध्याकाळी रिलीज होणार आहे. 

पुष्पाची श्रीवल्ली उर्फ ​​अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आज तिचा २७वा वाढदिवस साजरा करत आहे. हा प्रसंग आणखी खास बनवण्यासाठी तिच्या आगामी 'पुष्पा २' चित्रपटाच्या निर्मात्यांनी श्रीवल्लीच्या चाहत्यांना ही खास भेट दिली आहे. पुष्पा २चा दमदार टीझर रिलीज करण्यापूर्वी, दिग्दर्शक सुकुमार आणि त्यांच्या पुष्पा चित्रपटाच्या टीमने अभिनेत्रीला तिच्या वाढदिवसानिमित्त खूप गोंडस पोस्टरसह शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टरवर लिहिले की, 'पुष्पा द रुलची टीम आमच्या सुंदर श्रीवल्लीला म्हणजेच रश्मिका मंदान्नाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. तुम्ही फक्त लोकांची मने जिंकत रहा. 

इतकेच नाही तर रंजक गोष्ट म्हणजे या धमाकेदार टीझरच्या माध्यमातून निर्मात्यांनी पुष्पा २च्या टीमकडून आणखी एक सरप्राईज मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत. आयकॉन स्टार अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाला निर्माता रिलीज करणार आहेत. अल्लू अर्जुनचा ८ एप्रिलला वाढदिवस आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजेच ७ एप्रिलच्या संध्याकाळी पुष्पा द रुलची टीम चाहत्यांना आणखी एक भेट देणार आहे.

Web Title: Pushpa 2 Teaser: Finally fans wait is over..! 'Pushparaj' escaped from jail, watch the first glimpse of 'Pushpa 2'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.