Pushpa 2 First Look: 'पुष्पा २'मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक आला समोर, होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 14:49 IST2022-10-31T14:48:46+5:302022-10-31T14:49:23+5:30
Pushpa 2 Fame Allu Arjun : 'पुष्पा २'चे शूटिंग सुरू झाले असून यातून अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला आहे.

Pushpa 2 First Look: 'पुष्पा २'मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक आला समोर, होतोय व्हायरल
अभिनेता अल्लू अर्जुन(Allu Arjun)ने 'पुष्पा: द राइज' (Pushpa The Rise) या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच चित्रपट समीक्षकांचेही भरभरून प्रेम मिळाले. 'सामी सामी' आणि 'ओ अंटावा' सारख्या गाण्यांपासून ते 'पुष्पा, झुकेगा नही...'पर्यंत 'पुष्पा'च्या डायलॉग पर्यंत क्रेझ प्रेक्षकांमध्ये आहे. तेव्हापासून चाहते 'पुष्पा'च्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. 'पुष्पा २'(Pushpa 2)चे शूटिंग सुरू झाले असून यातून अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला आहे.
पुष्पा २ च्या शूटिंगला ३० ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. सिनेमॅटोग्राफर मिरोस्लाव कुबा ब्रोझेक यांनी 'पुष्पा: द रुल' म्हणजेच 'पुष्पा 2' मधील अल्लू अर्जुनचा पहिला फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अल्लू अर्जुनचा लूक खूपच इंटेन्स दिसत आहे. हे शेअर करत कुबा ब्रोजेकने लिहिले, 'अॅडव्हेंचर सुरू झाले आहे. आयकॉन स्टार अल्लू अर्जुनचे आभार. पुष्पा: द रुल.'
'पुष्पा २'मधील अल्लू अर्जुनचा लूक रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांची उत्कंठा वेगळ्याच पातळीवर आहे आणि ते अभिनेत्याच्या लूकचे कौतुक करताना चाहते थकत नाहीत. इतकंच नाही तर काही चाहत्यांनी असाही प्लॅन केला आहे की जेव्हा 'पुष्पा २' थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, तेव्हा अल्लू अर्जुनच्या एन्ट्रीवर ते काय करतील. अशी चर्चा कुबा ब्रोजेक यांच्या पोस्टवर काही चाहत्यांमध्ये सुरू आहे.
'पुष्पा: द राइज' २०२१ मध्ये रिलीज झाला आणि त्या वर्षातील सर्वात मोठा व्यावसायिक ब्लॉकबस्टर ठरला. त्यानंतर बॉक्स ऑफिसवर ३५० कोटींहून अधिक कमाई केली. 'पुष्पा' संपूर्ण भारतामध्ये प्रचंड यशस्वी ठरला. 'पुष्पा'ने महामारीच्या काळात ज्या प्रकारे भरपूर कमाई केली, ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अल्लू अर्जुनला पॅन इंडियाचा स्टार बनवण्यात या चित्रपटाचा मोठा हात होता. सुकुमार 'पुष्पा २' दिग्दर्शित करत आहेत. रश्मिका मंदान्ना, फहद फासिल आणि विजय सेतुपती देखील या चित्रपटात दिसणार आहेत.