'83'मध्ये सुनील गावस्कर यांची भूमिका साकारणाऱ्या पंजाबी अभिनेत्याचे महाराष्ट्राशी आहे खास नातं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 05:31 PM2020-03-05T17:31:57+5:302020-03-05T17:41:22+5:30

पंजाबी कुटुंबातील या अभिनेत्याचे आजोबा आणि बाबा वायुदलात कार्यरत होते.

Punjabi actor tahir bhasin mom is maharashtrian | '83'मध्ये सुनील गावस्कर यांची भूमिका साकारणाऱ्या पंजाबी अभिनेत्याचे महाराष्ट्राशी आहे खास नातं

'83'मध्ये सुनील गावस्कर यांची भूमिका साकारणाऱ्या पंजाबी अभिनेत्याचे महाराष्ट्राशी आहे खास नातं

googlenewsNext

ताहिर भासिनने आपल्या करिअरची सुरुवात 'किस्मत लव पैसा दिल्ली' या सिनेमातून केली मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती राणी मुखर्जीच्या मर्दानी सिनेमातून. या सिनेमात ताहिर राज भसिनने साकारलेली खलनायकाची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस पडली. यानंतर ताहिर मंटो आणि फोर्स-2 मध्ये दिसला. 


ताहिरच्या वैयक्तिक आयुष्यात बाबत बोलायचे झाले तर त्याचा जन्म दिल्लीतील एक पंजाबी कुटुंबात झाला आहे. ताहिरचे आजोबा आणि बाबा एअरफोर्समध्ये होते. त्यामुळे देशातील वेगवेगळ्या भागात ताहिरचे शिक्षण झाले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का पंजाबी कुटुंबात जन्मालेल्या ताहिरचे मराठीशी एक वेगळं नातं आहे. होय तुम्ही बरोबर वाचलातं. ताहिरच्या आईची आई मराठी आहे. त्यामुळे ताहिराला मराठी भाषा बऱ्यापैकी समजते. तसेच त्याला भविष्यात मराठी शिकायची देखील आहे असे. 


वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर, ताहिर रणवीर सिंगच्या 83 सिनेमात लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांची भूमिका साकारत आहे. रणवीर सिंगनंतर ताहिर भसीनचे कास्टिंग करणे सगळ्यात कठीण गेल्याचे कबीर खान सांगतो. नुकतेच लंडनमध्ये या सिनेमाचे पहिले शेड्यूल पूर्ण केले आहे. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.  '८३' हा  सिनेमा १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Punjabi actor tahir bhasin mom is maharashtrian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.