​पुलकित सम्राटने उचलला फोटोग्राफरवर हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 12:03 IST2017-01-24T06:33:24+5:302017-01-24T12:03:24+5:30

मीडियाच्या मंडळींवर कलाकारांनी हात उचलणे अथवा त्यांनी शिवीगाळ करणे यात काही नवीन नाही. सलमान खान, सैफ अली खान यांसारख्या ...

Pulled emperor picked up on the photographers | ​पुलकित सम्राटने उचलला फोटोग्राफरवर हात

​पुलकित सम्राटने उचलला फोटोग्राफरवर हात

डियाच्या मंडळींवर कलाकारांनी हात उचलणे अथवा त्यांनी शिवीगाळ करणे यात काही नवीन नाही. सलमान खान, सैफ अली खान यांसारख्या अनेक अभिनेत्यांच्या रोषाचा मीडिया प्रतिनिधींना सामना करावा लागला आहे. या अभिनेत्यांच्या यादीत आता आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे. पुलकित सम्राटने नुकताच चिडून एका फोटोग्राफरवर हात उगारला.
पुलकित सम्राट आणि त्याची पत्नी श्वेता रोहिरा घटस्फोट घेणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. अखेरीस श्वेताने घटस्फोटासाठी वांद्र्याच्या कोर्टात केस दाखल केली. केसच्या सुनावणासाठी पुलकित आणि श्वेता दोघांनीही कोर्टात हजेरी लावली होती. सुनावणी झाल्यानंतर ते दोघेही कोर्टाच्या बाहेर आले असता मीडियाच्या प्रतिनिधींनी पुलकितला घेरले आणि त्याला घटस्फोटाविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली.
श्वेता आणि पुलकितच्या घटस्फोटाविषयी एका मीडिया फोटोग्राफरने पुलकितला विचारले असता तो प्रचंड चिडला आणि त्याने त्या फोटोग्राफरची कॉलर पकडली. तिथे उपस्थित असलेले मंडळी सांगतात, फोटोग्राफर्सचा प्रश्न ऐकताच पुलकित प्रचंड चिडला. त्याने फोटोग्राफरची कॉलरच पकडली आणि त्याचा कॅमेरादेखील खाली फेकून दिला. एवढेच नव्हे तर पुलकितच्या वकिलांनीदेखील त्या फोटोग्राफरला धमकी दिल्याचे म्हटले जातेय. पुलकित फोटोग्राफरला मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो फोटोग्राफर त्याची हात जोडून माफी मागत आहे असा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाला आहे. 
पुलकित गेल्या कित्येक महिन्यांपासून त्याच्या व्यवसायिक जीवनापेक्षा वैयक्तिक जीवनामुळे अधिक चर्चेत आहे. पुलकितने सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिराशी 2014मध्ये लग्न केले होते. पण लग्नानंतर काहीच महिन्यात त्याच्या आणि यामी गौतमच्या अफेअरची मीडियात चर्चा सुरू झाली. श्वेता आणि पुलकितने लग्नाच्या वर्षभरातच वेगळे व्हायचा निर्णय घेतला. 

Web Title: Pulled emperor picked up on the photographers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.