नवाजुद्दीन सिद्दिकीने पतंगावर लव्ह मॅसेज लिहून केले होते प्रपोज; वाचा नवाजची लव्हस्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 20:30 IST2017-09-03T14:36:06+5:302017-09-03T20:30:37+5:30

तुम्हाला २०१३ मध्ये रिलीज झालेल्या दिग्दर्शक मृगदीपसिंग लांबा यांचा ‘फुकरे’ हा चित्रपट तर आठवत असेलच. या चित्रपटात अभिनेता पुलकित ...

Propose that Nawazuddin Siddiqui had written a love message on the moth; Read the love story! | नवाजुद्दीन सिद्दिकीने पतंगावर लव्ह मॅसेज लिहून केले होते प्रपोज; वाचा नवाजची लव्हस्टोरी!

नवाजुद्दीन सिद्दिकीने पतंगावर लव्ह मॅसेज लिहून केले होते प्रपोज; वाचा नवाजची लव्हस्टोरी!

म्हाला २०१३ मध्ये रिलीज झालेल्या दिग्दर्शक मृगदीपसिंग लांबा यांचा ‘फुकरे’ हा चित्रपट तर आठवत असेलच. या चित्रपटात अभिनेता पुलकित सम्राट, प्रिया आनंदला प्रपोज करण्यासाठी पतंगाचा आधार घेतो. तो पतंगावर लव्ह मेसेज लिहून पतंग प्रियापर्यंत पोहोचवितो. चित्रपटाला हा प्रसंग प्रेक्षकांना खूपच आवडला होता. हा झाला चित्रपटातील किस्सा, मात्र आम्ही आज तुम्हाला असा किस्सा सांगणार आहोत, जो रिअल लाइफमध्ये ‘फुकरे’ रिलीज होण्याच्या कित्येक वर्ष अगोदर घडला आहे. या किश्श्यामध्येही असेच काहीसे प्रपोजल ट्रिक वापरण्यात आले होते. 

मात्र हा फंडा कोणी वापरला त्या स्टारचे जर तुम्ही नाव ऐकाल तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. होय, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने प्रपोज करण्यासाठी हा फंडा वापरला होता. नवाजने कुठल्याही कबुतर किंवा आधुनिक मेसेंजरची प्रतीक्षा केली नाही, त्याने चक्क पतंगावर ‘दिल की बात’ लिहीत पतंग त्याच्या क्रशपर्यंत पोहोचविला. चला तर मग नवाजने नेमका कसा पतंग उडवित आपल्या प्रियसीला प्रपोज केले हे जाणून घेऊया. 



नुकत्याच रिलीज झालेल्या ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नवाजुद्दीनने या रहस्याचा उलगडा केला. ‘मुन्ना मायकल’मध्ये नवाजने एका दबंग महेंद्र फौजीची भूमिका साकारली. नवाज ‘मुन्ना मायकल’च्या प्रमोशनसाठी अभिनेता टायगर श्रॉफ आणि निधी अग्रवालसोबत एका रेडिओ स्टेशनमध्ये गेला होता. मुलाखतीदरम्यान टायगर, नवाज आणि निधी यांना त्यांच्या पहिल्या प्रेमाविषयी प्रश्न विचारण्यात आले. हा प्रश्न अगोदर टायगरला विचारण्यात आला. टायगरने लाजत उत्तर देताना म्हटले की, जेव्हा मी चौथीला होतो तेव्हा एका टीचरवर माझे प्रेम होते. त्यानंतर हाच प्रश्न नवाजला विचारण्यात आला. नवाजने म्हटले की, माझ्या गावात एक मुलगी होती. ती मला आवडायची. परंतु तिला प्रपोज कसे करायचे हा प्रश्न होता. अशात मी पतंगावर लव्ह मॅसेज लिहून तो पतंग तिच्या घरापर्यंत पोहोचवित होतो. 

नवाजने सांगितले की, त्याकाळी प्रमोज करायला हेच सर्वात चांगले माध्यम होते. नवाजनंतर हाच प्रश्न निधीला विचारण्यात आला. निधीने म्हटले की, कदाचित मी तिसरीत किंवा चौथीमध्ये असेल तेव्हा मी एका मुलाला खूपच इम्प्रेस झाली होती. आज तो मुलगा माझा चांगला मित्र आहे. 

Web Title: Propose that Nawazuddin Siddiqui had written a love message on the moth; Read the love story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.