‘कपूर अँड सन्स’चे आगळेवेगळे प्रोमोशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 07:46 IST2016-03-12T14:46:20+5:302016-03-12T07:46:20+5:30

चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी काय काय नाही ते फंडे वापरण्यात येतात. विविध ट्रिक्स आणि कल्पकता वापरून सिनेकलाकार जास्तीत जास्त प्रेक्षकांना थिएटरमध्ये ...

Promotion of 'Kapoor and Sons' | ‘कपूर अँड सन्स’चे आगळेवेगळे प्रोमोशन

‘कपूर अँड सन्स’चे आगळेवेगळे प्रोमोशन

त्रपटाच्या प्रोमोशनसाठी काय काय नाही ते फंडे वापरण्यात येतात. विविध ट्रिक्स आणि कल्पकता वापरून सिनेकलाकार जास्तीत जास्त प्रेक्षकांना थिएटरमध्ये येण्यास आकर्षित करण्यासाठी धडपड करत असतात.

येत्या १८ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘कपूर अँड सन्स’ चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट आणि फवाद खान यांनी निराळीच गोष्ट केली आहे. तिघांनी पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टवर समोरून चित्रपटाचे नाव आणि मागच्या बाजूस रिलिज डेट प्रिंट केली असून तेच परिधान करून सर्वांना चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रित करत आहेत.

धर्मा प्रोडक्शनच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांचा हा फोटो शेअर करण्यात आला आहे. पाहून तुम्हीच ठरवा की, तुम्हाला चित्रपट पाहणार की नाही.

{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Promotion of 'Kapoor and Sons'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.