निर्माता शाहरुखचे यशापयश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 02:56 IST2016-01-16T01:08:37+5:302016-02-12T02:56:18+5:30
बॉलिवूडमध्ये प्रत्येक ाच्या मनात फक्त एकच प्रश्न आहे की यावेळेस शाहरुख खानकडून कुठे चूक झाली, की ज्यामुळे 'दिलवाले'ला अपेक्षित ...
.jpg)
निर्माता शाहरुखचे यशापयश
ब लिवूडमध्ये प्रत्येक ाच्या मनात फक्त एकच प्रश्न आहे की यावेळेस शाहरुख खानकडून कुठे चूक झाली, की ज्यामुळे 'दिलवाले'ला अपेक्षित यश मिळू शकले नाही.
या चित्रपटाची कमाई चांगली असली तरी समीक्षकांच्या कसोटीवर चित्रपट कमजोर मानला जात आहे. शाहरुखला निर्माता म्हणून पहिल्यांदाच अयशस्वीतेचा सामना करावा लागत आहे असे नाही. याआधीही त्याला असे संमिश्र अनुभव आले आहेत.
निर्माता म्हणून 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' हा त्याचा पहिला चित्रपट होता. ज्याची निर्मिती शाहरुख खानने ड्रीम अनलिमिटेड कंपनीद्वारे केली होती. जूही चावला या चित्रपटात शाहरुखची नायिक होती आणि निर्माता म्हणून त्याची पार्टनरही होती. परंतु बॉक्स ऑफिसवर 'फिर भी दिल है हिंदुस्तानी'अयशस्वी ठरला. यानंतर शाहरूख खानला निर्माता म्हणून दुसरा झटका 'अशोका' या चित्रपटाने दिला. महान सम्राट अशोकच्या जीवनावर आधारित या चित्रपटात शाहरुखसोबत करिना कपूर होती. परंतु हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर आपटला. यानंतर शाहरुखने 'चलते चलते' बनविला, ज्यात आधी त्याच्यासोबत ऐश्वर्या रॉय होती. मात्र चित्रपटाच्या सेटवर सलमान खानने ऐश्वर्या रॉयला घेऊन जो हंगामा केला त्यामुळे शाहरुख त्रस्त झाला व त्याने ऐश्वर्याला काढून राणी मुखर्जीला घेतले. पती-पत्नीच्या नात्यावर आधारित हा चित्रपट गाण्यांमुळे हिट राहिला. मात्र यालाही मोठे यश नाही मिळू शकले.
निर्माता म्हणून शाहरुख खानला पहिले मोठे यश २00४ ला आलेल्या फरहा खानच्या निर्देशनातील 'मैं हूं ना'ला मिळाले. यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच २00५ मध्ये शाहरुख खानला निर्माता म्हणून दोन चित्रपटात झटके लागले. करण जाैहरच्या कं पनीसोबतच्या पार्टनरशिपमध्ये त्यांनी अजय देवगन, जान अब्राहम, विवेक ओबेराय यांना घेऊन 'काल' बनविला, जो बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप राहिला. याच वर्षी त्याने अमोल पालेकरला दिग्दर्शक म्हणून साईन करुन 'पहेली' चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला. मात्र एक शेड्यूलही पूर्ण झाले नसताना मोठा फेरफार करून शाहरुख खानने मेन लीडची जबाबदारी स्वत:च्या हाती घेतली आणि स्वत:च हीरो बनला. हा चित्रपटही फ्लॉप झाला.
२00७ मध्ये शाहरुख खानचा 'ओम शांति ओम' आला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले.
शाहरुखने आपल्या कंपनीत अजय देवगनच्या पंसतीचे रोहित शेट्टीसोबत चेन्नई एक्सप्रेस बनविला आणि यशाचा नवा धमाका केला.
मनोरंजनाच्या सर्व फॉर्मुल्यानंतर शाहरुख पुन्हा एकदा आपली मैत्रिण फरहाकडे परत आला आणि हॅप्पी न्यू ईयर बनविला.
ज्याने कमाईतर नक्की केली मात्र तो चांगला चित्रपट मात्र ठरू शकला नाही.