प्रियंका-इरफान करणार ‘गुस्ताखियां’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 08:39 IST2016-03-10T15:39:13+5:302016-03-10T08:39:13+5:30
आपल्या अभिनयाने केवळ भारतीयांनाच नव्हे तर विदेशी प्रेक्षकांनाही मोहित करणारा इरफान खान आणि प्रियंका चोपडा ही टॅलेन्टेड जोडी सिल्व्हर ...
.jpg)
प्रियंका-इरफान करणार ‘गुस्ताखियां’
आ ल्या अभिनयाने केवळ भारतीयांनाच नव्हे तर विदेशी प्रेक्षकांनाही मोहित करणारा इरफान खान आणि प्रियंका चोपडा ही टॅलेन्टेड जोडी सिल्व्हर स्क्रीनवर पुन्हा एकत्र दिसणार आहे. विशेष म्हणजे, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी या जोडीला एकत्र आणणार असल्याची खबर आहे. भन्साळींच्या ‘गुस्ताखियां’ या चित्रपटात प्रियंका व इरफान दिसणार असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट कवी व गीतकार साहिल लुधियानवी आणि कवयित्री अमृता प्रितम यांच्या प्रेमसंबंधांवर आधारित असल्याचे कळते. यापूर्वी ‘सात खून माफ’ या चित्रपटात प्रियंका-इरफान एकत्र दिसले होते.