​प्रियंकाची उडविली जातेय इंटरनेटवर खिल्ली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 10:27 IST2016-06-21T04:57:13+5:302016-06-21T10:27:13+5:30

आजच्या इंटरनेटयुगात सेलिब्रेटींच्या प्रत्येक गोष्टींवर कॉमेंट केले जाते. मग ते स्तुती असो वा टर... नेट भाषेत सांगायचे तर ‘ट्रोलिंग’ ...

Priyanka flew down on the Internet ... | ​प्रियंकाची उडविली जातेय इंटरनेटवर खिल्ली...

​प्रियंकाची उडविली जातेय इंटरनेटवर खिल्ली...

च्या इंटरनेटयुगात सेलिब्रेटींच्या प्रत्येक गोष्टींवर कॉमेंट केले जाते. मग ते स्तुती असो वा टर... नेट भाषेत सांगायचे तर ‘ट्रोलिंग’ केली जाते.

अशीच ट्रोलिंग बिचाऱ्या ‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडाला सहन करावी लागत आहेत. क्वांटिको मालिकेत काम केल्यावर ती आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटी म्हणून ओळखली जाऊ लागली.

‘मॅक्झिम’ नावाच्या एका नावाजलेल्या इंग्लिश मॅगझिनने तिला तर ‘हॉटेस्ट वुमन इन द वर्ल्ड’ घोषित केले. याच मॅगझिनच्या मुखपृष्ठावरील तिच्या फोटोची सध्या इंटरनेटवर खिल्ली उडविली जात आहे.

या कव्हर फोटोमध्ये तिचे सौंदर्य अधिक खुलवून दाखविण्यासाठी फोटोशॉप इफेक्ट्सच्या भरपूर प्रमाणात वापर करण्यात आल्याने सोशल मीडियावर ‘ट्रोलिंग’ला उत आला आहे.

खासकरून तिचे आर्मपिट्स एवढे स्मूद कसे काय, असा सवाल ट्विटरवर विचारला जात आहे. एकाने ट्विट केले की, फोटोशॉप करून तर कोणीही हॉट दिसू शकते. प्रियंकाने जरी याबाबत अजुन जरी प्रतिक्रिया दिलेली नाही.

Web Title: Priyanka flew down on the Internet ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.