​प्रियांका चोप्राच्या शॉर्ट ड्रेसवरून उठले वादळ; ट्रोल करणा-यांना दिले Legs for days....चे उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2017 12:49 IST2017-05-31T07:10:54+5:302017-05-31T12:49:10+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी बर्लिन येथे असल्याचे प्रियांकाला कळले अन् तिने पंतप्रधानांची भेट घेण्याचे ठरविले. मोदींबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. प्रियांकाच्या मोदींसोबतच्या या फोटोला हजारो लाईक्स मिळालेत. पण तेवढ्याच अनेकांना प्रियांकाचा हा फोटो खटकलाही.

Priyanka Chopra's Short Dress Strikes Given to Trolls Legs for days .... Answers! | ​प्रियांका चोप्राच्या शॉर्ट ड्रेसवरून उठले वादळ; ट्रोल करणा-यांना दिले Legs for days....चे उत्तर!

​प्रियांका चोप्राच्या शॉर्ट ड्रेसवरून उठले वादळ; ट्रोल करणा-यांना दिले Legs for days....चे उत्तर!

रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या चार देशांच्या दौºयावर आहेत. काल मंगळवारी ते जर्मनी, बर्लिन येथे पोहोचले. याचठिकाणी बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडाही तिच्या ‘बेवॉच’ या पहिल्या हॉलिवूडपटाच्या प्रमोशनसाठी पोहचली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी बर्लिन येथे असल्याचे प्रियांकाला कळले अन् तिने पंतप्रधानांची भेट घेण्याचे ठरविले. ‘अविस्मरणीय क्षण’, असे या भेटीचे वर्णन करत प्रियांकाने मोदींबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.  ‘अविस्मरणीय योगायोग. पंतप्रधान मोदीजी बर्लिनला असताना मीही त्याठिकाणी होते. पीएम मोदी सर, धन्यवाद!  तुम्ही तुमच्या अतिशय व्यस्त वेळात मला भेटण्याची संधी दिली’, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले. प्रियांकाच्या मोदींसोबतच्या या फोटोला हजारो लाईक्स मिळालेत. पण तेवढ्याच अनेकांना प्रियांकाचा हा फोटो खटकलाही.







ALSO READ : बर्लिन येथे पंतप्रधान आल्याचे समजताच प्रियंका चोपडाने घेतली त्यांची भेट!

होय, खरे तर या सर्वांना प्रियांकाचा ड्रेस खटकला. देशाच्या पंतप्रधानांना भेटताना प्रियांकाने असा शॉर्ट ड्रेस घालायला नको होता, असा सल्ला या सगळ्यांनी दिला. यावरून मग प्रियांका सोशल मीडियावर ट्रोल झाली. पण प्रियांका या सगळ्याची पर्वा करणाºयांपैकी थोडीच आहे. सोशल मीडियावर ट्रोल करणा-यांना तिनेही चांगलेच आडव्या हाताने घेतले. ट्रोल करणा-यांना खरमरीत उत्तर देण्यासाठी तिने तिचा आई मधुसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत प्रियांकाची आईने शॉर्ट ड्रेस घातलेला आहे आणि दोघींचेही पाय दिसताहेत.  माय-लेकीचा हा फोटोही बर्लिनमधला आहे.
 


हा फोटो शेअर करताना प्रियांकाने लिहिलेय, ‘लेग्ज फॉर अ डे...’!!
प्रियांकाच्या या कॅप्शनमधून ट्रोल करणा-यांना त्यांचे उत्तर मिळाले असणार, ही अपेक्षा करूयातं. अर्थात प्रियांका अशाप्रकारे पहिल्यांदा ट्रोल झालेली नाही. तर यापूर्वी मेट गाला सोहळ्यांतील तिच्या गाऊनवरून तिला ट्रोल केले गेले होते. त्यावेळीही प्रियांकाने ट्रोल करणा-यांना सणसणीत उत्तर दिले होते.

Web Title: Priyanka Chopra's Short Dress Strikes Given to Trolls Legs for days .... Answers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.