चश्मे बद्दूर! प्रियंका चोप्राच्या गॉगलमधील फोटोने वेधून घेतले चाहत्यांचे लक्ष, फोटोवर लाईक्सचा वर्षाव
By गीतांजली | Updated: September 22, 2020 16:32 IST2020-09-22T16:02:21+5:302020-09-22T16:32:37+5:30
देसी प्रियंका चोप्रा कोणत्याना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते.

चश्मे बद्दूर! प्रियंका चोप्राच्या गॉगलमधील फोटोने वेधून घेतले चाहत्यांचे लक्ष, फोटोवर लाईक्सचा वर्षाव
देसी प्रियंका चोप्रा कोणत्याना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून यूएसमध्ये असलेली प्रियंका चाहत्यांशी संवाद साधत असते. पती निक सोबतचे फोटो, व्हिडीओ प्रियंका इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आता ही प्रियंका तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रियंकाने गॉगल लावलेला दिसतोय. फोटोसोबत प्रियंकाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'चश्मे बद्दूर' वाईट नजरेपासून दूर राहण्यासाठी.' प्रियंकाचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. आतापर्यंत या फोटोवर 12 लाखाहुन अधिक लाईक्स मिळाले आहेत. प्रियंका जरी परदेशात राहत असली तरी बॉलिवूडमध्ये तिचे प्रचंड फॅनफॉलोईंग आहे. वयाच्या 17 व्या वर्षी प्रियंकाने बी-टाऊनमध्ये एंट्री घेतली.
प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकतेच तिने अॅमेझॉनसोबत दोन वर्षांच्या 'मल्टीमिलियन-डॉलर फर्स्ट-लुक टेलीविजन डील'वर हस्ताक्षर केले आहेत. ही माहिती खुद्द प्रियंकाने इंस्टाग्रामवर दिली होती. यासोबतच ती लवकरच राजकुमार रावसोबत एका चित्रपटात झळकणार आहे. प्रियंकाचे चाहते तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पीसी शेवटची ती द स्काय इज पिंक या सिनेमात दिसली होती. यात प्रियंकासोबत फरहान अख्तर, झायरा वसीम आणि रोहित शराफ हे कलाकार होते. ती या चित्रपटाची निर्मातीदेखील होती.
जेव्हा प्रियंकाला चित्रपटातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसाढसा रडत कसंबसं सावरलं होतं स्वतःला