कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रियांका चोप्राच्या 'पहुना'चा फर्स्ट लूक रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 13:31 IST2017-05-23T05:19:20+5:302017-05-23T13:31:38+5:30
बॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माती प्रियांका चोप्रा हिच्या 'पहुना' या चित्रपटाचे फार्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे, कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ...

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रियांका चोप्राच्या 'पहुना'चा फर्स्ट लूक रिलीज
ब लिवूड अभिनेत्री आणि निर्माती प्रियांका चोप्रा हिच्या 'पहुना' या चित्रपटाचे फार्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे, कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये हा लूक रिलीज करण्यात आला. प्रियांका आणि तिची आई मधु चोप्रा यांच्या पर्पल पेबल या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार करत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर 21 मे ला रिलीज करण्यात आला यावेळी प्रियांका उपस्थिती नव्हती मात्र प्रियांकाची आई आणि भाऊ सिद्धार्थ चोप्रा त्याठिकाणी उपस्थित होते. याचित्रपटाचे दिग्दर्शन पाखी ए.टायरवाला करत आहेत. कांससारख्या प्रतिष्ठित फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा पहिला लूक रिलीज झाला हे आमच्या टीमसाठी सन्मानाची बाब असल्याचे मत मधु चोप्रा यांनी व्यक्त केले आहे.
पहुनामध्ये तीन नेपाळी मुलांच्या प्रेम, शक्ति आणि धौर्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ही मुले नक्षलवाद्यांच्या आंदोलनात सहभागी होत नेपाळ वरुन सिक्किमला पोहोचतात. यादरम्यान त्यांची त्यांच्या आई-वडिलांपासून ताटातूट होते. या चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञान हे सिक्किममध्येच राहाणारे आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरवर दोन मुले आहेत. ज्यातली मुलगी काही तरी बनवताना दिसतेय तर मुलगा एका लहान बाळाला संभाळताना दिसतोय.
![]()
प्रियांकाने मराठी चित्रपट व्हेंटिलेटरमधून निर्माती क्षेत्रात पदार्पण केले. प्रियांकाच्या व्हेंटिलेटर चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ही आपली मोहोर उमटवली. तब्बल 3 राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाने पटाकवले. सध्या प्रियांका तिच्या हॉलिवूड डेब्यूला घेऊन खूपच उत्साहित आहेत. येत्या शुक्रवारी तिचा बेवॉच हा पहिला हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होतो आहे. भारतात हा चित्रपट 2 जूनला रिलीज होणार आहे. प्रियांका भारतात परतल्यावर आपल्या बॉलिवूडमधील मित्र-मौत्रिणींसाठी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवणार आहे.