- तर प्रियांका चोप्राची ‘या’ चित्रपटाद्वारे होणार बॉलिवूड वापसी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2017 12:48 IST2017-04-10T07:18:59+5:302017-04-10T12:48:59+5:30
प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये बिझी आहे. निश्चिपणे प्रियांकाचे चाहते तिच्या बॉलिवूड वापसीकडे डोळे लावून बसले आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रियांका ...

- तर प्रियांका चोप्राची ‘या’ चित्रपटाद्वारे होणार बॉलिवूड वापसी?
प रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये बिझी आहे. निश्चिपणे प्रियांकाचे चाहते तिच्या बॉलिवूड वापसीकडे डोळे लावून बसले आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रियांका भारतात आली होती, तेव्हा मी लवकरच बॉलिवूडमध्ये परतणार, असे वचन तिने आपल्या चाहत्यांना दिले होते. हे वचन प्रियांकाने तंतोतंत पाळले आहे.त्यामुळेच प्रियांकाच्या बॉलिवूड वापसीकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांसाठी आमच्याकडे आनंदाची बातमी आहे. होय, प्रियांका लवकरच बॉलिवूडमध्ये परतणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांकाच्या प्रॉडक्शन हाऊसने ‘पिंक’चे डायरेक्टर अनिरूद्ध रॉय चौधरी यांचा एक महिलाकेंद्रीत सिनेमा साईन केला आहे. या चित्रपटात प्रियांका दिसणार आहे. अर्थात ती यात लीड रोलमध्ये असणार की कॅमिओ करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. याशिवाय संजय लीला भन्साळींसोबत तिने काही चित्रपटांवर चर्चा चालवली आहे. याशिवाय राकेश ओमप्रकाश मेहरा आणि अशाच काही बड्या दिग्दर्शकांसोबतही तिची चर्चा सुरु आहे. प्रियांका अखेरची प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’मध्ये दिसली होती. अर्थात हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार चालला नाही. यानंतर मात्र प्रियांका हॉलिवूडलाच रवाना झाली.
ALSO READ : प्रियांका चोप्रा बनली जगातील दुसरी सुंदर महिला!
लवकरच प्रियांकाचा पहिला-वहिला हॉलिवूडपट ‘बेवॉच’ रिलीज होतो आहे. यानंतर मे ते आॅगस्टच्यादरम्यान प्रियांका तिच्या बॉलिवूड चित्रपटाचे शूटींग करणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे, हे शूटींग संपताच प्रियांका पुन्हा हॉलिवूडला रवाना होणार आहे. कारण ‘क्वांटिको’ या अमेरिकन शोच्या तिसºया सीझनचे शूटींग सुरु होणार आहे. याशिवाय आणखी एक हॉलिवूडपट तिला पूर्ण करायचा आहे.