प्रियंका चोप्राने लग्नाबाबत केला खुलासा, म्हणाली- आधी विचार करुन अस्वस्थ व्हायचे

By गीतांजली | Updated: November 7, 2020 10:56 IST2020-11-07T10:45:38+5:302020-11-07T10:56:21+5:30

प्रियंका चोप्रा तिच्या विवाहित जीवनात खूप आनंदी आहे.

Priyanka chopra was very uncomfortable with marriage thought | प्रियंका चोप्राने लग्नाबाबत केला खुलासा, म्हणाली- आधी विचार करुन अस्वस्थ व्हायचे

प्रियंका चोप्राने लग्नाबाबत केला खुलासा, म्हणाली- आधी विचार करुन अस्वस्थ व्हायचे

प्रियंका चोप्रा तिच्या विवाहित जीवनात खूप आनंदी आहे. सोशल मीडियावर पती निकसोबतचे फोटो याचाच पुरावा आहेत. तथापि, नुकत्याच झालेल्या मुलाखतीत तिने सांगितले की एक वेळ अशी होती की, जेव्हा ती लग्नाबद्दल विचार करून अनकम्फर्टेबल होऊन जायची. 

People मॅगजीनला दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकाने सांगितले की, तिच्याकडे काही सवयी आहेत ज्याला स्वीकारणे आता सोपे झाले आहे. पीसीने सांगितले की ती महत्वाकांक्षी आहे आणि तिची एक कोमल बाजूसुद्धा आहे. तिने सांगितले की, एक वेळ अशी होती की लग्न करणे तिच्यासाठी खूप विचित्र होते.

एकमेकांना खूप वेळ दिला
प्रियंका आणि निक जोनस एकमेकांच्या प्रेमात पडले १ डिसेंबर २०१८ रोजी हिंदू पद्धतीने तर २ डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने दोघांचं लग्न झालं होतं. दोनही स्टार्सचे शेड्यूल खूप बिझी असते, मात्र तरीही ते एकमेकांसाठी वेळ काढतात. दोघे मिळून जगभराची सैर करतात. 

करवाचौथच्या दिवशी पीसी दिसली देसीलूकमध्ये 
अलीकडेच प्रियंका चोप्राने करवा चौथचे सेलिब्रेशन करतानाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. यावेळी लाल रंगाची साडी प्रियंकाने परिधान केली होती. सोशल मीडियावर प्रियंकाचे हे फोटो पाहून चाहतेही खुश झाले होते. त्यांनीही लाईक्स आणि कमेंट करत तिचे कौतुक केले होते. 
 

Web Title: Priyanka chopra was very uncomfortable with marriage thought