​‘त्या’ काळात सलग दहा दिवस झोपली नव्हती प्रियांका चोप्रा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 17:48 IST2016-12-20T17:48:39+5:302016-12-20T17:48:39+5:30

प्रियांका चोप्रा आज यशाच्या शिखरावर आहे. बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही तिचाच डंका आहे. पण हे यश सहजासहजी मिळालेले नाही. ...

Priyanka Chopra was not sleeping for ten days in that time. | ​‘त्या’ काळात सलग दहा दिवस झोपली नव्हती प्रियांका चोप्रा!!

​‘त्या’ काळात सलग दहा दिवस झोपली नव्हती प्रियांका चोप्रा!!

रियांका चोप्रा आज यशाच्या शिखरावर आहे. बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही तिचाच डंका आहे. पण हे यश सहजासहजी मिळालेले नाही. यामागे आहे प्रियांकाची अपार मेहनत. काल स्टारडस्ट अवार्डमध्ये प्रियांका सहभागी झाली. यावेळी प्रियांकाने तिच्या बॉलिवूडमधील प्रवासाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. एक काळ असा होता जेव्हा मी सलग १० दिवस झोपले नव्हते, असे तिने यावेळी सांगितले.

होय, २००६ मध्ये प्रियांका चार चित्रपटांमध्ये व्यस्त होती आणि रोज पाच पाच शिफ्टमध्ये काम करत होती. ते दिवस आठवताना प्रियांका म्हणाली, ते माझ्या करिअरचे प्रारंभीचे दिवस होते. मला आजही आठवते. ‘ऐतराज’,‘मुझसे शादी करोगी’ यासह आणखी दोन असे एकूण चार चित्रपट मी करत होते. चार शिफ्टमध्ये काम सुरु होते. यामुळे मी सलग १० दिवस न झोपता काम करत होते. 





एकाचवेळी वेगवेगळ्या चित्रपटांचे संवाद तुझ्या कसे लक्षात राहतात? असे प्रियांकाला विचारण्यात आले. यावर मी असे केलेय आणि करतेय, असे ती म्हणाली. ‘बाजीराव मस्तानी’चे शूटींग सुरु असताना ‘क्वांटिको’चेही शूटींग सुरु होते. मी रविवारी यायचे आणि ‘बाजीराव मस्तानी’चे शूटींग करायचे. हे शूटींग संपताच  त्याचदिवशी परत जाऊन ‘क्वांटिको’चे शूट करायचे, असे तिने सांगितले.हॉलिवूडमधील तिच्या प्रवासाबद्दलही प्रियांका बोलली. स्वत:च्या जवळच्या लोकांना, घराला सोडून दूर देशात जाऊन काम करणे हा नवा अनुभव असतो. तसाच एकटेपणाचा अनुभव देणाराही असतो. पण भारतीय प्रेक्षकांच्या, माझ्या हितचिंतकांच्या प्रेमामुळे आणि पाठींब्यामुळे मी जगभरात माझी ओळख निर्माण करू शकले. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानेल, असे ती म्हणाली.

तब्बल सहा महिन्यानंतर काल-परवा प्रियांका मुंबईत आली. कुटुंबासोबत दोन आठवडे घालवल्यानंतर प्रियांका पुन्हा हॉलिवूड प्रोजेक्टसाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. प्रियांका सध्या ‘क्वांटिको2’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. लवकरच प्रियांकाचा ‘बेवॉच’ हा हॉलिवूडपट रिलीज होतो आहे.

Web Title: Priyanka Chopra was not sleeping for ten days in that time.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.