​प्रियांका चोप्राला लहानपणी बनायचे होते ‘कामवाली बाई’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 14:46 IST2017-08-04T09:11:12+5:302017-08-04T14:46:28+5:30

आपल्या अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकणारी प्रियांका चोप्रा लहानपणी काय बनण्याचे स्वप्न बघायची? डॉक्टर, इंजिनिअर, मॉडेल, अभिनेत्री की आणखी काही? काही अंदाज बांधू शकता?

Priyanka Chopra wanted to be a kid at 'Kamwali Bai' !! | ​प्रियांका चोप्राला लहानपणी बनायचे होते ‘कामवाली बाई’!!

​प्रियांका चोप्राला लहानपणी बनायचे होते ‘कामवाली बाई’!!

ल्या अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकणारी प्रियांका चोप्रा लहानपणी काय बनण्याचे स्वप्न बघायची? डॉक्टर, इंजिनिअर, मॉडेल, अभिनेत्री की आणखी काही? काही अंदाज बांधू शकता? कदाचित नाहीच. कारण तुम्ही कितीही अंदाज बांधलेत, तरी तुमचे अंदाज चुकणारच चुकणार. कारण लहानपणी प्रियांकाच्या मनात जे काही बनण्याची इच्छा होती, ते तुमच्या डोक्यात चुकूनही येऊ शकत नाही. त्यामुळे आता फार वेळ न घेता, प्रियांकाला लहानपणी काय बनायची इच्छा होती, हे आम्हीच तुम्हाला सांगतो.




प्रियांकाला लहानपणी ‘कामवाली बाई’ बनण्यात इंटरेस्ट होता. दचकलात ना? पण खरे आहे. एका मुलाखतीत तिने स्वत:च हे सांगितलेय. BUILD LDNला अलिकडे तिने मुलाखत दिली. यात ती अनेक प्रश्नांची उत्तरे देताना दिसली. पहिला जॉब? पहिला बिग ब्रेक? असे अनेक प्रश्न. यात एक प्रश्न होता, ‘फर्स्ट थिंक यू वॉन्टेट टू बी?’ असा. या प्रश्नावर प्रियांकाने न लाजता, ‘मेड’ अर्थात ‘कामवाली बाई’ असे उत्तर दिले. मला लहानपणी ‘कामवाली बाई’ बनावेसे वाटायचे. तेव्हा मला ‘कामवाली बाई’ बनण्यातच इंटरेस्ट होता. माझी आई यामुळे चिंतेत असायची. पण मी मज्जेत. कारण मला स्वच्छता करणे, झाडू लावणे मनापासून आवडते. मी लहानपणी घर स्वच्छ करायचे. झाडू मारायचे. माझ्यामते, यात वाईट काहीच नाही. मी आजही माझ्या घराची स्वच्छता स्वत: करते, असे तिने या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
एकंदर काय, तर यशाच्या शिखरावर पोहोचूनही प्रियांकाचे पाय अद्यापही जमिनीवर आहेत, हेच तिच्या या उत्तरातून दिसते. तुम्हाला काय वाटते?

Web Title: Priyanka Chopra wanted to be a kid at 'Kamwali Bai' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.