लंडनच्या रस्त्यावर प्रियंका चोप्रा दिसली स्नोफॉलमध्ये मस्ती करताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 14:01 IST2021-01-25T14:00:32+5:302021-01-25T14:01:05+5:30
प्रियंका चोप्राचा नुकताच 'द व्हाइट टायगर' चित्रपट रिलीज झाला आहे.

लंडनच्या रस्त्यावर प्रियंका चोप्रा दिसली स्नोफॉलमध्ये मस्ती करताना
प्रियंका चोप्राचा नुकताच 'द व्हाइट टायगर' चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. या चित्रपटाची समीक्षकांनीदेखील प्रशंसा केली आहे. या चित्रपटात प्रियंका शिवाय राजकुमार राव आणि आदर्श राव मुख्य भूमिकेत आहे. सध्या प्रियंका लंडनमध्ये आगामी चित्रपट टेक्स्ट फॉर यूच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे आणि आता तिने इंस्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिने व्हाइट रंगाचा लॉंग जॅकेट घातलेला दिसते आहे.
प्रियंका चोप्राचा एक फोटो सध्या व्हायरल होताना दिसतो आहे. या फोटोत ती लंडनच्या रस्त्यावर स्नोफॉलमध्ये गिरक्या घेताना दिसते आहे. यात ती खूप सुंदर दिसते आहे. तिचा हा फोटो पाहून ती स्नो व्हाइट सारखी वाटतेय असे म्हणणे वावगं ठरणार नाही. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्राने तिचे पुस्तक प्रियंका चोप्रा जोनस अनफिनिशड हातात घेऊन एक व्हिडीओ शेअर केला होता.
प्रियंका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती टेस्ट फॉर यू चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग तिने नुकतेच लंडनमध्ये पूर्ण केले आहे. तसेच तिचा नुकताच वी कॅन बी हिरोज हा चित्रपट रिलीज झाला आहे.
शेवटची प्रियंका चोप्रा द स्काय इज पिंकमध्ये झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर आणि झायरा वसीम मुख्य भूमिकेत होते.