प्रियांका चोप्राची जाऊ तिच्यापेक्षा ४ वर्षांनी लहान; पाहा तिचे Photos

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 18:53 IST2018-12-02T16:35:02+5:302018-12-02T18:53:44+5:30

आता प्रियांका ही मिसेस जोनास बनली असून तिच्या सासरच्या मंडळींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. लक्षवेधून घेणारी बाब म्हणजे तिची मोठी जाऊ. ती देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिच्यापेक्षा तब्बल ४ वर्षांनी लहान आहे. तिचे काही हॉट आणि स्टायलिश फोटो व्हायरल झाले.

Priyanka Chopra is less than 4 years younger than her; See her photos | प्रियांका चोप्राची जाऊ तिच्यापेक्षा ४ वर्षांनी लहान; पाहा तिचे Photos

प्रियांका चोप्राची जाऊ तिच्यापेक्षा ४ वर्षांनी लहान; पाहा तिचे Photos

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे एकमेकांसोबत ख्रिश्चियन पद्धतीने विवाहबद्ध झाले आहेत. सगळीकडे त्यांच्या जोधपूरमधील शाही विवाहाची चर्चा आहे. आता प्रियांका ही मिसेस जोनास बनली असून तिच्या सासरच्या मंडळींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तिला सासू-सासरे, जाऊ-दीर, ननंद-ननंदोई असे सगळे नवे नाते मिळाले आहेत. पण, यात लक्षवेधून घेणारी बाब म्हणजे तिची मोठी जाऊ. ती देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिच्यापेक्षा तब्बल ४ वर्षांनी लहान आहे. तिचे काही हॉट आणि स्टायलिश फोटो व्हायरल झाले असून आम्ही तुमच्यासाठी ते घेऊन आलो आहोत.

 प्रियांका चोप्राच्या सासरच्या मंडळींमध्ये सासू-सासरे यांच्याशिवाय तिला दोन दीर, दोन जाऊ आहेत. निक याचे कुटुंब कॅलिफोर्नियाच्या वायकॉफमध्ये राहते. निकने अशातच लॉस एंजलिसमध्ये घर खरेदी केले आहे. प्रियांकाची मोठी जाऊ आणि केविनची पत्नीचे नाव डेनियल डेलिसा असून ती प्रियांकापेक्षा ४ वर्षांनी लहान आहे. तसेच तिच्या पतीपेक्षा जवळपास १ वर्ष मोठी आहे. डेनियल हिने रिअ‍ॅलिटी शोमध्ये काम केलेले आहे. हेअर ड्रेसिंग म्हणून तिने तिचे करिअर सुरू केले होते. 

 

आज २ डिसेंबरला प्रियांका व निक हिंदू पद्धतीने विवाहबद्ध होत आहेत. जोधपूरच्या उमेद भवन या रॉयल पॅलेसमध्ये हे शाही लग्न होणार आहे.  हिंदू पद्धतीच्या विवाहात निक अगदी राजसी थाटात बग्घीवरून एन्ट्री घेणार आहे. हिंदू पद्धतीनुसार होणा-या  लग्नात प्रियांका चोप्रा अबू जानी आणि संदीप खोसला किंवा सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केलेल्या लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसणार आहे.  

 

 अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास व प्रियांका अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. याचवर्षी प्रियांकाच्या वाढदिवसाला निक भारतात आला होता आणि याचठिकाणी त्याने पीसीला लग्नासाठी प्रपोज केली. यानंतर भारतातचं प्रियांका व निकचा 'रोका' झाला होता.  लग्नानंतर प्रियांका-निक दोन रिसेप्शन देतील. यापैकी एक दिल्लीत होईल तर दुसरे मुंबईत. 

Web Title: Priyanka Chopra is less than 4 years younger than her; See her photos