शहनाज ट्रेजुरीवालाला वाटतोय प्रियांका चोप्राचा हेवा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2017 15:14 IST2017-05-21T09:44:48+5:302017-05-21T15:14:48+5:30
गत काही वर्षांत अनेक भारतीय कलाकारांनी हॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावले. पण सगळ्यांनाच यश मिळाले असे नाही. फार मोजक्याच लोकांना ...

शहनाज ट्रेजुरीवालाला वाटतोय प्रियांका चोप्राचा हेवा?
ग काही वर्षांत अनेक भारतीय कलाकारांनी हॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावले. पण सगळ्यांनाच यश मिळाले असे नाही. फार मोजक्याच लोकांना हॉलिवूडच्या यशाची गोडी चाखता आली आणि या यादीत प्रियांका चोप्राचे नाव सर्वाधिक वरचे आहे. अनेकांनी प्रियांकाच्या या यशामागचे खरे कारण, त्यामागचे रहस्य याचा शोध घेण्याचे प्रयत्न केलेत. शहनाज ट्रेजुरीवाला ही सुद्धा यापैकीच एक़ होय, कदाचित म्हणूनच इतक्या अमेरिकन फिल्म्स व शो केल्यानंतर आपल्याला प्रियांकासारखी लोकप्रीयता आणि प्रसिद्धी का मिळवता येऊ नये, हा प्रश्न तिला पडला आहे.
शहनाज एक बॉलिवूड अभिनेत्री. गेल्या अनेक वर्षांत बॉलिवूडमध्ये ती कुठेच नव्हती. लवकरच ती टायगर श्रॉफसोबत ‘मुन्ना मायकल’मध्ये दिसणार आहे. अलीकडे एका मुलाखतीत शहनाजला याबद्दल विचारण्यात आले. पण याचे सरळ थेट उत्तर देण्याऐवजी शहनाजने वेगळाच सूर लावला. गेल्या सहा वर्षांपासून मी भारतात नाही. मी अनेक अमेरिकन फिल्म्स आणि टीव्ही शोमध्ये काम करतेय. सध्या मी ‘ब्रॉऊन नेशन’ या अमेरिकन शोमध्ये काम करतेय, असे शहनाज म्हणाली. ती केवळ इथेच थांबली नाही तर तिची गाडी अचानक प्रियांका चोप्रावर घसरली. खरे तर मी प्रियांकाच्या आधी अमेरिकन टीव्ही व फिल्म्समध्ये काम करणे सुरु केले. पण माझ्याकडे प्रियांकासारखी पब्लिसिटी मशिन नव्हती, नाहीय,असे ती म्हणाली. आता शहनाज असे का म्हणाली, हे कळायला मार्ग नाही. पण शेवटी कुणालाही हेवा वाटावा, असेच प्रियांकाचे यश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकन टीव्ही करणाºया शहनाजला प्रियांकाचा हेवा वाटते तर अगदी साहजिक आहे. तुम्हाला काय वाटते?