प्रियांका चोप्राला या कारणामुळे मुंबई महानगर पालिकेने बजावली नोटिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 15:19 IST2018-07-03T15:16:10+5:302018-07-03T15:19:08+5:30

प्रियांका चोप्राला मुंबई महानगर पालिकेने नुकतीच नोटिस बजावली आहे. अनधिकृत बांधकामाप्रकरणी तिला ही नोटिस बजावण्यात आली असून अंधेरीतील तिच्या एका जागेसंदर्भात ही नोटिस आहे.

Priyanka Chopra gets notice from BMC for illegal construction | प्रियांका चोप्राला या कारणामुळे मुंबई महानगर पालिकेने बजावली नोटिस

प्रियांका चोप्राला या कारणामुळे मुंबई महानगर पालिकेने बजावली नोटिस

प्रियांका चोप्रा सध्या चांगलीच चर्चेत आहे. ती तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असल्याची आपल्याला दिसून येत आहे. प्रियांका चोप्रा आणि तिचा बॉयफ्रेंड निक जोनास हे दोघेही नुकतेच भारतात येऊन गेले. त्यांनी येथे आल्यानंतर त्यांच्या प्रेमाची अप्रत्यक्ष कबुलीच दिली असे म्हटल्यास काहीही चुकीचे ठरणार नाही. प्रियांका आणि निकच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होत असतानाच प्रियांका आता आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. 
प्रियांकाला मुंबई महानगर पालिकेने नुकतीच नोटिस बजावली आहे. अनधिकृत बांधकामाप्रकरणी तिला ही नोटिस बजावण्यात आली असून अंधेरीतील तिच्या एका जागेसंदर्भात ही नोटिस आहे. अंधेरी पश्चिममधील ओशिवरा येथील एका व्यापारी संकुलात प्रियांकाची जागा आहे. ही जागा तिने भाड्याने दिली आहे. या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आले असल्यामुळे पालिकेकडून तिला नोटिस बजावण्यात आली आहे.
प्रियांका चोप्राच्या मालकीच्या असलेल्या या भागात एक स्पा असून या जागेत अनधिकृतपणे बदल करण्यात आले असल्याची तक्रार या परिसरातील रहिवाशांनी मुंबई महानगर पालिकेला केली होती. या तक्रारीची दखल घेत पालिका अधिकाऱ्यांनी या सलोनला भेट दिली होती. त्यावेळी येथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचसोबत तिच्या प्रिसिंक्ट बिल्डिंगमधील जागेला देखील अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. त्यावेळी या बिल्डिंगमधील जागेचा वापर ऑफिस म्हणून करत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. या ऑफिसमध्येही नियमांचं उल्लंघन करून बांधकाम करण्यात आल्याचे आढळून आल्यामुळे तिला दोन नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत.
प्रियांका आणि निक दोघे सुमारे आठवडाभर भारतात होते. खास प्रियांकाच्या आईला. कुटुंबाला भेटायला निक भारतात आला होता. भारतात निक, प्रियांका अगदी बिनधास्त एकत्र फिरले, हातात हात घालून पार्ट्यांना पोहोचले.  यानंतर गेल्या गुुरूवारी रात्री प्रियांका निकसोबत अमेरिकेला रवाना झाली आणि या कथित जोडप्याचा भारत दौरा संपला. ते त्यानंतर दोघे ब्राझीलमध्ये देखील एकत्र दिसले होते. निकने ब्राझिलमध्ये विलामिक्स फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म केला होता. या लाईव्ह कॉन्सर्टला प्रियांकाने देखील हजेरी लावली होती.  

Web Title: Priyanka Chopra gets notice from BMC for illegal construction