Hoteness Alert : वहिनी सोफी टर्नरसोबत प्रियांका चोप्राने एन्जॉय केला पूलसाईड टाइम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 18:51 IST2019-08-04T18:45:36+5:302019-08-04T18:51:12+5:30
प्रियांका चोप्रा हिचे तिची वहिनी सोफी टर्नरसोबत पूलसाईड असलेले काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्विमकॉस्च्युममध्ये असलेल्या त्या दोघी खूपच हॉट दिसत आहेत.

Hoteness Alert : वहिनी सोफी टर्नरसोबत प्रियांका चोप्राने एन्जॉय केला पूलसाईड टाइम!
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या व्हेकेशन मूडमध्ये आहे. मियामी येथे ती आपल्या कुटुंबियांसोबत ती क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे. प्रियांका चोप्रा हिचे तिची वहिनी सोफी टर्नरसोबत पूलसाईड असलेले काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्विमकॉस्च्युममध्ये असलेल्या त्या दोघी खूपच हॉट दिसत आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर धूम करत आहेत.
बॉलिवूडची ग्लोबल आयकॉन ठरलेली प्रियांका चोप्रा ही कायम वेगवेगळया कारणांमुळे चर्चेत असते. अशातच तिच्या प्रेगनंन्ट असल्याच्या चर्चांवरून बातम्यांना उधाण आले होते. सध्या तिचे हे हॉट फोटो इंटरनेटवर चर्चेत आहेत. तिने ब्राऊन कलरची बिकिनी घातली होती. काही फोटोंमध्ये ती सोफी टर्नरसोबत बोलताना दिसत आहे. त्या दोघींमधील चर्चेमुळे त्यांच्यातील बाँडिंग चांगली असावी, असे वाटतेय. तसेच सोफी टर्नर ही ग्रीन कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. सोफीच्या चेहऱ्यावर एक आनंद पसरलेला दिसतो आहे. ती प्रियांका चोप्रासोबत वेळ घालवून प्रचंड आनंदी दिसत आहे. फोटोंवरून असे दिसत आहे की त्या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी असून त्यांना एकमेकांची कंपनी प्रचंड आवडते, असे वाटते.