माधुरी दीक्षितच्या आयुष्यावर विनोदी मालिकेची निर्मिती करणार प्रियांका चोप्रा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 13:36 IST2017-07-29T07:57:36+5:302017-07-29T13:36:31+5:30

बॉलिवूडची देसीगर्ल प्रियांका चोप्रा हिने हॉलीवूडमध्ये पदार्पण करुन ती तिथे बरीचशी रुळली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका चोप्रा ही ...

Priyanka Chopra to create a comedy series on the life of Madhuri Dixit? | माधुरी दीक्षितच्या आयुष्यावर विनोदी मालिकेची निर्मिती करणार प्रियांका चोप्रा?

माधुरी दीक्षितच्या आयुष्यावर विनोदी मालिकेची निर्मिती करणार प्रियांका चोप्रा?

लिवूडची देसीगर्ल प्रियांका चोप्रा हिने हॉलीवूडमध्ये पदार्पण करुन ती तिथे बरीचशी रुळली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका चोप्रा ही आता एका विनोदी मालिकेची निर्मिती करते आहे. ही मालिका बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिच्या आयुष्याशी निगडित आहे. व्हरायटी. कॉमच्या रिपोर्टनुसार ही मालिका माधुरीच्या जीवनावर आधारित असेल. लग्नानंतर माधुरी अमेरिकेत शिफ्ट झाली तिथे गेल्यावर तिचा अनुभव, तिथल्या कुटुंबांबरोबर तिने घालवलेला वेळ आणि माधुरीने तिथे केलेले बदल हे सर्व यात पाहायला मिळणार आहे अर्थात ही मालिका विनोदी असणार आहे.

डॉ. नेनेशी लग्न झाल्यावर माधुरीने चित्रपटातून ब्रेक घेतला आणि ती अमेरिकेत शिफ्ट झाली होती. त्यानंतर काही वर्षांनी ती भारतात परतली. 2 सुंदर मुलांची आई असलेल्या माधुरीने 5 वर्षांपूर्वी चित्रपट सृष्टीत पुन्हा पदार्पण केले आहे आणि आजही तिचा जादू कायम आहे. 

माधुरीला या मालिकेबद्दल विचारले असता ती म्हणाली " अमेरिकेत राहुन मला फार छान वाटले. तो एक चांगला अनुभव होता. मला तिथे फार मजा आली तुम्हाला लवकरच कळेल मला नेमकं काय म्हणायचे आहे ते." श्री राव ही मालिका लिहणार असून त्यांना माधुरीचे पती डॉ नेनेसुद्धा साथ देणार आहेत. व्हराईटी. कॉमच्या वृत्तानुसार मार्क गॉर्डन कंपनी तर्फे निक पेपर आणि मार्क गॉर्डन हे निर्माते असून एबीसी स्टुडिओ सहनिर्मिती करणार आहेत. 

ALSO READ :  see photo : ​ OMG !! प्रियांका चोप्राने हे काय केले?

प्रियांका क्वंटिको या अमेरिकन मालिकेत झळकली होती. त्याची तिसरी सीरिजसुद्धा आता सुरू होणार आहे. प्रियांका ने बेवॉच या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये डेब्यु केले होता. त्यानंतर ती 'अ किड लाईक अ जॅक’ आणि ‘इज इन्ट इट रोमॅन्टिक’ या दोन चित्रपटात झळकणार आहे.   

Web Title: Priyanka Chopra to create a comedy series on the life of Madhuri Dixit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.