प्रियंका चोप्रा नवरा निक जोनसच्या या सवयीला म्हणते 'विचित्र', सकाळी उठल्यावर बेडरूममध्ये करतो हे काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 11:51 IST2020-12-02T11:51:13+5:302020-12-02T11:51:39+5:30
अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या लग्नाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.

प्रियंका चोप्रा नवरा निक जोनसच्या या सवयीला म्हणते 'विचित्र', सकाळी उठल्यावर बेडरूममध्ये करतो हे काम
बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या लग्नाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. त्यांनी २०१८ साली १ आणि २ डिसेंबरला वेगवेगळ्या रितीरिवाजात लग्न केले होते. लग्नापूर्वी त्या दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केले होते. निक जोनससोबत लग्न केल्यानंतर प्रियंका चोप्राने त्याच्याबद्दल मजेशीर खुलासे केले आहेत.
प्रियंका चोप्राने निक जोनसबद्दल खुलासा केला आहे की सकाळी उठल्यावर सर्वात पहिल्यांदा बेडरूममध्ये तो काय करतो. प्रियंका चोप्राने मागील वर्षी एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले होते. यावेळी प्रियंकाने लग्नापासून निक जोनसशी निगडीत बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला होता. प्रियंका चोप्राने निक जोनसबद्दल खूप रोमँटिक गोष्टी सांगितल्या होत्या.
प्रियंका चोप्रा म्हणाली होती की, तिचा नवरा नेहमी तिच्याकडे आकर्षित होत असतो आणि दररोज सकाळी उठल्यावर तिचा चेहरा पाहतो. त्यावर ती म्हणाली होती की, हे थोडे विचित्र आहे पण निक जोनस दररोज सकाळी उठल्यावर माझा चेहरा बघतो जेव्हा मी सकाळी झोपेतून उठते तेव्हा. मस्करीत प्रियंकाने पुढे सांगितले की, निक जेव्हा मला असा पाहते तेव्हा मी त्याला बोलते एक मिनिट थांब मी थोडा मेकअप करते.
प्रियंका पुढे म्हणाली होती की, जेव्हा तो मला पाहतो तेव्हा मला थोडे विचित्र वाटते. मी फक्त हेच म्हणते की मला झोप येते आहे पण तो नेहमी माझे झोप असलेले डोळे पाहून अप्रतिम आणि स्वीट म्हणतो. थोडे विचित्र आहे पण ठीक आहे. जर त्याला हे आवडते तर. प्रियंका म्हणाली की, मी मस्करी करत नाही. खरेच अप्रतिम वाटते.
याशिवाय प्रियंका चोप्रा निक जोनसबद्दल नेहमी खुलासे करत असते. प्रियंका चोप्रा आणि निक जोनसने जोधपूर उमेद भवन येथे रॉयल वेडिंग केले होते. लग्नासाठी संपूर्ण पॅलेस चार दिवसांसाठी बुक केले होते. या चार दिवसात बाहेरील व्यक्तीला आत येण्यास सक्त मनाई होती.