प्रियांका चोप्रा लग्नात दिसणार ‘या’ खास आऊटफिटमध्ये; वऱ्हाडी मंडळीही घालणार डिझायनर आऊटफिटस!! वाचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 13:26 IST2018-12-01T13:25:28+5:302018-12-01T13:26:27+5:30

आता संपूर्ण जगाचे लक्ष प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाकडे लागले आहे. ते दोघे कोणत्या प्रकारे लग्न करणार? इथपासून ते कोणत्या स्टाईलचे ड्रेसेस घालणार इथपर्यंत सर्व चर्चांना उधाण आले आहे. चाहत्यांनाही आता त्यांच्या लग्नाच्या प्रत्येक बातमीची उत्सुकता लागली आहे.

Priyanka Chopra to be seen in a special 'Outfit' Designer's Outfits to Unfold Read ... | प्रियांका चोप्रा लग्नात दिसणार ‘या’ खास आऊटफिटमध्ये; वऱ्हाडी मंडळीही घालणार डिझायनर आऊटफिटस!! वाचा...

प्रियांका चोप्रा लग्नात दिसणार ‘या’ खास आऊटफिटमध्ये; वऱ्हाडी मंडळीही घालणार डिझायनर आऊटफिटस!! वाचा...

आता संपूर्ण जगाचे लक्ष प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाकडे लागले आहे. ते दोघे कोणत्या प्रकारे लग्न करणार? इथपासून ते कोणत्या स्टाईलचे ड्रेसेस घालणार इथपर्यंत सर्व चर्चांना उधाण आले आहे. चाहत्यांनाही आता त्यांच्या लग्नाच्या प्रत्येक बातमीची उत्सुकता लागली आहे. त्यासाठीच आम्ही एक खास बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ती अशी की, २ डिसेंबर रोजी उमेद भवन येथे ख्रिश्चन पद्धतीनुसार होणाऱ्या  लग्नात प्रियांका चोप्रा ही कस्टम मेड राल्फ लॉरेन गाऊनमध्ये दिसणार आहे. 

आता ख्रिश्चन पद्धतीनुसार होणाऱ्या  लग्नासाठी ती कस्टम मेड राल्फ लॉरेन गाऊनमध्ये दिसणार हे तर कळालेच मात्र, ती हिंदू पद्धतीनुसार होणाऱ्या लग्नात कोणत्या आऊटफिटमध्ये दिसणार याची उत्सुकता अद्याप कायम आहेच. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू पद्धतीनुसार होणाऱ्या  लग्नात प्रियांका चोप्रा अबू जानी आणि संदीप खोसला किंवा सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केलेल्या लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसणार आहे. आता या दोन्ही आऊटफिटमध्ये कशी दिसणार? ही तर उत्सुकता आहेच. पण आमच्याकडे अजून एक खास बातमी चाहत्यांसाठी आहे. 

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचे लग्न अविस्मरणीय होण्यासाठी त्यांनी जशी जय्यत तयारी केली होती त्याचप्रमाणे प्रियांका चोप्रा आणि निक जोनासही विशेष लक्ष देत आहेत. संपूर्ण जगाने या नयनरम्य आणि आतीषबाजीने पूर्ण असलेल्या विवाहसोहळयाचे साक्षीदार व्हावे असे त्या दोघांनाही वाटत आहे. या लग्नाचे अजून एक विशेष असे की, या लग्नात केवळ वर-वधू हेच नव्हे तर लग्नातील वऱ्हाडी  मंडळी, नातेवाईक हे देखील डिझायनर आऊटफिटमध्ये दिसतील. हे आऊटफिट्स अबूजानी आणि संदीप खोसला पुनीत बलाना यांनी डिझाईन केलेले असणार आहेत.         

Web Title: Priyanka Chopra to be seen in a special 'Outfit' Designer's Outfits to Unfold Read ...