प्रियांका चोप्राची युनिसेफच्या ‘ग्लोबल अ‍ॅम्बेसिडर’पदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 22:05 IST2016-12-13T20:17:38+5:302016-12-13T22:05:54+5:30

priyanka chopra is unicef global ambassador ; संयुक्त राष्ट्र संघाचा एक भाग असलेल्या ‘युनिसेफ’ या संघटनेने प्रियांका चोप्राची ‘ग्लोबल अ‍ॅम्बेसिडर’पदी नियुक्ती केली आहे. प्रियांकाला मिळालेल्या या सन्मानामुळे सोशल मीडियावरही तिचे कौतुक केले जात आहे.

Priyanka Chopra appoints UNICEF as 'Global Ambassador' | प्रियांका चोप्राची युनिसेफच्या ‘ग्लोबल अ‍ॅम्बेसिडर’पदी नियुक्ती

प्रियांका चोप्राची युनिसेफच्या ‘ग्लोबल अ‍ॅम्बेसिडर’पदी नियुक्ती

ong>बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळख मिळविणारी प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूड प्रोजेक्टस्मध्ये व्यस्त आहे. प्रियांकाने अभिनेत्री, निर्माती म्हणून ओळख मिळविली असतानाच आणखी एक मानाचा तुरा तिच्या शिरपेचात रोवला गेला आहे. संयुक्त राष्ट्र संघाचा एक भाग असलेल्या ‘युनिसेफ’ या संघटनेने प्रियांका चोप्राची ‘ग्लोबल अ‍ॅम्बेसिडर’पदी नियुक्ती केली आहे.  प्रियांकाला मिळालेल्या या सन्मानामुळे सोशल मीडियावरही तिचे कौतुक केले जात आहे. 

प्रियांका चोप्राने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटहून ही आनंदाची बातमी शेअर केली. जागतिक स्तरावर बालहक्कांसाठी काम करणाºया ‘फॉर एव्हरी चाइल्ड’या उपक्रमासाठी प्रियांका काम करणार आहे. यापूर्वी देखील तिची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली होती हे विशेष. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणासाठी व त्यांच्या सक्षमीकरणासाठी युनिसेफच्यावतीने उपक्रम राबविण्यात आले होते. या उपक्रमाची ती अ‍ॅम्बेसिडर होती. त्यावेळी तिच्या या कामाची दखल मीडियाने घेतली होती. याच पाश्वभूमीचा विचार करीत प्रियांकाला संधी मिळाली आहे. 

">http://


प्रियांका चोप्रा सध्या अमेरिकन टीव्ही शो ‘क्वाटिंको २’ यात काम करीत आहे. या टीव्ही शोसाठी तिला अमेरिकेत पीपल्स चॉईस अवॉर्ड देत सन्मान करण्यात आला होता. ड्वेन जॉनसन याची भूमिका असलेल्या आगामी ‘बेवॉच’ या चित्रपटात प्रियांकाची भूमिका असून, याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. मात्र बेवॉचचे ट्रेलर पाहून तिच्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. ट्रेलरमध्ये केवळ काही सेकंदासाठीच ती दिसली होती. 

">http://


प्रियांकाने भोजपुरी, मराठी व पंजाबी चित्रपटाची निर्मिती केली आहे. यातील पंजाबी चित्रपट लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. प्रियांका लवकरच बॉलिवूडमध्ये परतणार असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. 

Web Title: Priyanka Chopra appoints UNICEF as 'Global Ambassador'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.