या अटीवर ‘बॉन्ड गर्ल’ बनणार प्रियांका!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 21:49 IST2016-08-13T16:19:01+5:302016-08-13T21:49:01+5:30
प्रियांका चोप्रा सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. असायलाही हवी कारण बाई साहेबांना एकापाठोपाठ एक हॉलिवूड प्रोजेक्ट जे मिळताहेत. आता खबर ...

या अटीवर ‘बॉन्ड गर्ल’ बनणार प्रियांका!!
प रियांका चोप्रा सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. असायलाही हवी कारण बाई साहेबांना एकापाठोपाठ एक हॉलिवूड प्रोजेक्ट जे मिळताहेत. आता खबर आहे ती, प्रियांका नवी बॉन्ड गर्ल बनणार असल्याची. हॉलिवूडमध्ये प्रियांकाच्या कामाचा सपाटा पाहता या बातमीत तसा दमही आहेच. खरे तर प्रियांकाला बॉन्ड गर्लच्या रूपात पाहणे कुणाला आवडणार नाही. पण खुद्द प्रियांकाचे याबद्दलचे मत विचाराल तर यासाठी तिची एक अट आहे. होय, प्रियांकाला बॉन्ड गर्ल बनण्याबाबत विचारण्यात आल्यावर तिने ही अट बोलून दाखवली. मी बॉन्ड गर्ल बनण्यास तयार आहे पण माझ्या कॅरेक्टरचे नाव ‘जेन’ असावे, अशी माझी अट असल्याचे तिने सांगितले. आता नावात काय, हे तर प्रियांकाने सांगितले नाही. कदाचित ‘जेन’ व ‘जेम्स’च्या उच्चात बºयाच अर्थी साम्य आहे, म्हणूनही असेल. वेल, प्रियांकाची अट हॉलिवूड मेकर्स लक्षात घेतील,अशी आशा करूयात!!