उमेद भवनमध्ये रंगली क्रिकेट मॅच; निकने मारला सिक्सर!! पाहा व्हिडीओ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 10:16 IST2018-12-02T16:58:34+5:302018-12-03T10:16:59+5:30

जोधपूरच्या उमेद भवन येथे क्रिकेट मॅच रंगली. या मॅचमध्ये निकने सिक्सर मारला आणि त्याचा व्हिडीओ मिसेस प्रियांका जोनास हिने चक्क सोशल मीडियावर शेअर देखील केला.

Priyanka And Nick Wedding: Cricket match at Umed Bhavan; Nick Jonas Hit Sixer !! Watch video ... | उमेद भवनमध्ये रंगली क्रिकेट मॅच; निकने मारला सिक्सर!! पाहा व्हिडीओ...

उमेद भवनमध्ये रंगली क्रिकेट मॅच; निकने मारला सिक्सर!! पाहा व्हिडीओ...

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे एकमेकांसोबत ख्रिश्चियन पद्धतीने विवाहबद्ध झाले आहेत. सगळीकडे त्यांच्या जोधपूरमधील शाही विवाहाची चर्चा आहे. आता प्रियांका ही मिसेस जोनास बनली असून तिच्या सासरच्या मंडळींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. पण आता मात्र एक वेगळीच चर्चा सुरू झालीय ती म्हणजे जोधपूरच्या उमेद भवन येथे रंगलेल्या क्रिकेट मॅचची. या मॅचमध्ये निकने सिक्सर मारला आणि त्याचा व्हिडीओ मिसेस प्रियांका जोनास हिने चक्क सोशल मीडियावर शेअर देखील केला.    

सुत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संगीत सोहळयामध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी ही क्रिकेट मॅच आयोजित केली होती. वधूची टीम आणि वराची टीम अशा दोन टीममध्ये ही मॅच घेण्यात आली. पीसीच्या टीमने निळया रंगाच्या टीशर्टवर ‘टीम ब्राईड’ अशा नावासह तर निकच्या टीमने पांढऱ्या  रंगाच्या जर्सीजवर टीम ग्रुम अशा कॉस्च्युममध्ये दिसत होती. यावेळी रंगलेल्या मॅचमध्ये निकने सिक्सर मारून प्रचंड टाळया मिळवल्या. त्याच्या या सिक्सरचा व्हिडीओ प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर शेअर केला असून तिने त्याला कॅप्शन देत पतीवरचा अभिमान व्यक्त केला. 

आज २ डिसेंबरला प्रियांका व निक हिंदू पद्धतीने विवाहबद्ध होत आहेत. जोधपूरच्या उमेद भवन या रॉयल पॅलेसमध्ये हे शाही लग्न होणार आहे.  हिंदू पद्धतीच्या विवाहात निक अगदी राजसी थाटात बग्घीवरून एन्ट्री घेणार आहे. हिंदू पद्धतीनुसार होणा-या लग्नात प्रियांका चोप्रा अबू जानी आणि संदीप खोसला किंवा सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केलेल्या लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसणार आहे.      

Web Title: Priyanka And Nick Wedding: Cricket match at Umed Bhavan; Nick Jonas Hit Sixer !! Watch video ...