प्रियंकाला केवळ एकच भीती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 20:21 IST2016-07-09T14:51:26+5:302016-07-09T20:21:26+5:30

बॉलिवूडनंतर हॉलीवूडमध्ये पाय रोवू पाहणारी अभिनेत्री प्रियंका चोपडाला स्टारडम हरवण्याची नाही पण क्रिएटीव्हीटी हरवण्याची भीती जरूर वाटते. होय. ‘क्वांटिको२’साठी ...

Priyakala only one fear! | प्रियंकाला केवळ एकच भीती!

प्रियंकाला केवळ एकच भीती!

लिवूडनंतर हॉलीवूडमध्ये पाय रोवू पाहणारी अभिनेत्री प्रियंका चोपडाला स्टारडम हरवण्याची नाही पण क्रिएटीव्हीटी हरवण्याची भीती जरूर वाटते. होय. ‘क्वांटिको२’साठी पीसी नुकतीच अमेरिकेला रवाना झाली. सध्या तरी पीसीकडे कुठलाही हिंदी सिनेमा नाहीय. पण असे असूनही मला स्टारडम हरवण्याची अजिबात भीती वाटत नाही, असे पीसी सांगते. मी केवळ माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करते. कारण प्रत्येक कामात अव्वल येणे मला आवडते. प्रत्येक जण आपआपल्या करिअरमध्ये यशाचे शिखर गाठतो. या शिखरावर कायम राहायचे असेल तर सतत कष्ट करावे लागतील. मी मॉडेलिंगपासून सुरुवात केली. मग चित्रपट केले. सध्या मी हॉलीवूडमध्ये काम करतेय. माझे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊसही मी सुरु केले आहे. मी स्वत:ला क्रिएटीव व्यक्ति मानते. क्रिएटीव असाल तर फेम हरवण्याची भीती वाटत नाही. त्यामुळेच स्टारडम हरवेल, याची चिंता मला सतावत नाही.  माझी किएटीविटी संपणार तर नाही, केवळ ही एकच भीती मला सतावत असते, असे पीसी म्हणाली..आॅल दी बेस्ट पीसी...तुझी क्रिएटीविटी कधीच हरवू नये, हीच कामना!

Web Title: Priyakala only one fear!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.