प्रिया प्रकाश वारियरने फिल्मी करिअरबद्दल केला मोठा खुलासा! चाहत्यांचा होऊ शकतो हिरमोड!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 12:50 IST2018-02-20T07:20:56+5:302018-02-20T12:50:56+5:30
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे एका रात्रीत सेलिब्रिटी बनलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर सध्या स्टारडम एन्जॉय करतेय. पण ...

प्रिया प्रकाश वारियरने फिल्मी करिअरबद्दल केला मोठा खुलासा! चाहत्यांचा होऊ शकतो हिरमोड!!
इ टरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे एका रात्रीत सेलिब्रिटी बनलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर सध्या स्टारडम एन्जॉय करतेय. पण तिच्या चाहत्यांसाठी मात्र एक वाईट बातमी आहे. होय, प्रियाने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक भलामोठा संदेश लिहिला आहे. या संदेशात प्रियाने ‘ओरू अडार लव’ या चित्रपटाच्या अख्ख्या टीमचे मनापासून आभार मानले आहेत. अर्थात आभार मानण्यासोबतच चाहत्यांचा हिरमोड करणारी एक गोष्टही तिने स्पष्ट केली आहे. होय, आॅगस्टपर्यंत कुठलाही चित्रपट साईन करणार नाही, असे प्रियाने या संदेशात स्पष्ट केले आहे. माझ्याकडे अनेक चित्रपटांच्या आॅफर्स आहेत. पण ‘ओरू अडार लव’ हा चित्रपट पूर्ण होईपर्यंत म्हणजेच येत्या आॅगस्टपर्यंत मी कुठलाही सिनेमा साईन करणार नाही, असे प्रियाने म्हटले आहे. या देशात अनेक प्रतिभावान लोक आहेत. या सर्वांना संधी मिळावी, अशी आशाही तिने व्यक्त केली आहे.
![]()
ALSO READ : ‘व्हायरल गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरचा आणखी एक ‘खल्लास’ व्हिडिओ !पाहा, ‘ओरू अडार लव’चा valentines day special teaser!!
‘ओरू अडार लव’ या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याच्या या क्लिपने प्रिया प्रकाश एका रात्रीत स्टार झालीयं. ही क्लिप इतक्या वेगाने व्हायरल झाली की, एकाच दिवसांत प्रियाच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या सहा लाखांवर पोहोचली. या फॅन फॉलोविंगने प्रियाला जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब्स बनवले. या व्हिडिओत प्रिया प्रकाश ‘आंखों ही आंखों में’ रोमान्स करताना दिसतेय. येत्या ३ मार्चला ‘ओरू अडार लव’ हा चित्रपट रिलीज होतो आहे. प्रिया ही केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे. डान्स आणि भटकंती हे तिचे आवडते छंद आहेत. बी कॉम फर्स्ट ईअरची विद्याथीर्नी असलेली प्रिया सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. ‘ओरू अडार लव’ या आपल्या पहिल्या चित्रपटात प्रिया एका किशोरवयीन मुलीच्या भूमिकेत आहे. किशोरवयात मनात फुलू लागलेल्या प्रेमाची कथा यात आहे.