करिना कपूर आणि सैफ अली खानच्या आधी यावर्षी शाहिद कपूर, तुषार कपूर , रितेश देशमुख, फवाद खान हे सेलिब्रेटी बनले होते पालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:42 IST2016-12-21T12:11:08+5:302016-12-21T16:42:26+5:30

सैफ अली खान आणि करिनाच्या घरात नुकताच एक नवीन पाहुणा आला आहे. या पाहुण्यासाठी घरात सध्या जय्यत तयारी सुरू ...

Prior to Kareena Kapoor and Saif Ali Khan, Shahid Kapoor, Tusshar Kapoor, Riteish Deshmukh, Fawad Khan became celebrity this year | करिना कपूर आणि सैफ अली खानच्या आधी यावर्षी शाहिद कपूर, तुषार कपूर , रितेश देशमुख, फवाद खान हे सेलिब्रेटी बनले होते पालक

करिना कपूर आणि सैफ अली खानच्या आधी यावर्षी शाहिद कपूर, तुषार कपूर , रितेश देशमुख, फवाद खान हे सेलिब्रेटी बनले होते पालक

फ अली खान आणि करिनाच्या घरात नुकताच एक नवीन पाहुणा आला आहे. या पाहुण्यासाठी घरात सध्या जय्यत तयारी सुरू आहे. सैफ आणि करिना पालक बनल्यामुळे खूपच खूश आहेत. या वर्षी पालक बनणारे करिना आणि सैफ हे पहिले सेलिब्रेटी नाहीत तर अनेक सेलिब्रेटींच्या घरात या वर्षी बाळाचे आगमन झाले आहे. कोण आहेत हे सेलिब्रेटी यावर नजर टाकूया...


शाहिद कपूर
शाहिद कपूर आणि करिना कपूरचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. पण काही काळानंतर त्यांनी ब्रेकअप केले आणि शाहिदने मीरासोबत लग्न केले. मीरा आणि शाहिदला 26 ऑगस्टला मुलगी झाली. शाहिद आणि मीरा या दोघांच्या नावावरून तिचे नाव मिशा ठेवण्यात आले आहे.

shahid kapoor mira rajput

तुषार कपूर 
तुषार कपूरला मुलगा झाला ही बातमी ऐकून खरे तर सगळ्यांना धक्का बसला होता. पण त्याला मुलगा सरोगसीच्या मदतीने झाला हे त्याने पत्रकार परिषद घेऊन मीडियाला सांगितले होते.

tushar kapoor

 

रितेश देशमुख
रितेश आणि जेनेलिया डिसोझाने 2012मध्ये लग्न केले. 2014मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला आणि आता यावर्षीच्या 1 जूनला जेनेलियाने त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. 

ritesh deshmukh genelia d

फवाद खान 
पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या पत्नीने ऑक्टोबरमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्याचे हे दुसरे अपत्य असून एलिना असे त्याने त्याच्या नन्ही परीचे नाव ठेवले आहे. पाकिस्तानी कलाकारांनी बॉलिवूड चित्रपटात काम करू नये असा भारतात निर्णय घेण्यात आला त्यावेळी फवादच्या बॉलिवूड चित्रपटांचे काय होणार या टेन्शनमध्ये तो होता. याच काळात त्याच्या घरात या नव्या पाहुण्याचे आगमन झाले

fawad khan

Web Title: Prior to Kareena Kapoor and Saif Ali Khan, Shahid Kapoor, Tusshar Kapoor, Riteish Deshmukh, Fawad Khan became celebrity this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.