प्रीती झिंटा निर्दोष!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 17:55 IST2016-03-23T00:55:03+5:302016-03-22T17:55:03+5:30
चेक बाउन्सप्रकरणी अभिनेत्री प्रीति झिंटा हिची मुंबईच्या एका न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. पटकथा लेखक अब्बास टायरवाला यांनी प्रीतिविरूद्ध ...

प्रीती झिंटा निर्दोष!!
च क बाउन्सप्रकरणी अभिनेत्री प्रीति झिंटा हिची मुंबईच्या एका न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. पटकथा लेखक अब्बास टायरवाला यांनी प्रीतिविरूद्ध चेक बाउंन्स प्रकरणी तक्रार दाखल केली होती. प्रीतिच्या वकीनांनी दिलेल्या माहितीनुसार, टायरवाला यांनी ठेवलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे न्यायालयास आढळले. टायरवाला यांनी प्रीतिच्या ‘इश्क इन पॅरिस’ चित्रपटाची पटकथा लिहिली होती. प्रीतिने आपल्याला या मोबदल्यात १८.९ लाख रूपयांचा चेक दिला होता पण तो बाउन्स झाला,असा आरोप टायरवाला यांनी केला होता. प्रीतीच्या वकीलांनी हा आरोप खोडून काढला. मला न सांगता चेक बँकेत जमा करू नका, असे प्रीतिने टायरवाला यांना चेक देताना सांगितले होते, असे त्यांनी न्यायालयासमक्ष सांगितले. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत, प्रीतिची या प्रकरणातून निर्दोष सुटका केली.