टीम इंडियाच्या पराभवानंतर युजर्सच्या निशाण्यावर आली प्रेग्नंट अनुष्का शर्मा, ट्विटरवर होतेय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 11:17 AM2020-12-20T11:17:19+5:302020-12-20T11:20:19+5:30

सोशल मीडियावर मीम्सचा पूर

pregnant anushka sharma blamed for virat kohlis performance india vs aus odi twitter |  टीम इंडियाच्या पराभवानंतर युजर्सच्या निशाण्यावर आली प्रेग्नंट अनुष्का शर्मा, ट्विटरवर होतेय ट्रोल

 टीम इंडियाच्या पराभवानंतर युजर्सच्या निशाण्यावर आली प्रेग्नंट अनुष्का शर्मा, ट्विटरवर होतेय ट्रोल

googlenewsNext
ठळक मुद्दे याआधीही अनेकदा टीम इंडिया व विराट कोहलीच्या खराब परफॉर्मन्ससाठी अनुष्काा ट्रोल केले गेले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिची प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. मात्र क्रिकेट जगतातील गॉसिप्समध्ये तिचे नाव गोवण्याचा ‘सिलसिला’ मात्र अद्यापही सुरू आहे. भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने खराब खेळी केली रे केली की अनुष्का ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. याआधी अनेकदा असे झालेय आणि आत्ताही पुन्हा एकदा याच कारणासाठी अनुष्काला ट्रोल केले जातेय.
 ऑस्ट्रेलियासोबतच्या पहिल्या कसोटीत  भारतीय संघाला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. तीन दिवसांहून कमी कालावधीत  ऑस्ट्रेलियाने पाहुण्यांना हार मानण्यास भाग पाडले. टीम इंडियाला दुस-या डावात अवघ्या 36 धावा करता आल्या. कसोटी क्रिकेटमधील भारताची ही सर्वात निचांक कामगिरी आहे. क्रिकेटप्रेमी यामुळे बिथरले आणि त्यांनी विराटची पत्नी अनुष्काला ट्रोल करणे सुरु केले.

भारतीय संघाच्या पराभवाचे संपूर्ण खापर विराटची प्रेग्नंट पत्नी अनुष्काच्या माथी फोडण्यात आले. विराट कोहलीचा फोकस टीम इंडियावर नाही तर आपल्या कुटुंबावर आहे आणि याचमुळे टीम इंडियाला इतका लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला, असा आरोप करत ट्रोलर्सनी अनुष्काला लक्ष्य केले. यानंतर ट्विटरवर अनुष्काचे नाव ट्रेंड होऊ लागले.

नाराज क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियवर मीम्सचा पाऊस पाडला. यात अनुष्का व विराट दोघांनाही ट्रोल केले गेले. अनेकांनी तर विराटला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी केली. काही लोकांनी या पराभवासाठी थेट अनुष्काला जबाबदार धरले. अर्थात हे पहिल्यांदा घडलेले नाही. याआधीही अनेकदा टीम इंडिया व विराट कोहलीच्या खराब परफॉर्मन्ससाठी अनुष्काा ट्रोल केले गेले आहे. विराटचा सामना पाहण्यासाठी अनुष्का मैदानात गेली, तेव्हाही लोकांनी तिला ट्रोल केले होते. या ट्रोलर्सला विराट व अनुष्का दोघांनीही खरमरीत उत्तर दिले होते.

Web Title: pregnant anushka sharma blamed for virat kohlis performance india vs aus odi twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.