मोहोब्बते फेम प्रीती झांगियानीने केले आहे या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 01:19 PM2021-03-23T13:19:00+5:302021-03-23T13:23:48+5:30

प्रीतीने या चित्रपटाआधी एका अल्बममध्ये काम केले होते. तिच्यावर चित्रीत करण्यात आलेले छुई मुई सी... हे गाणे प्रचंड प्रसिद्ध झाले होते. प्रीती आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही.

preeti jhangiani is married to parvin dabas | मोहोब्बते फेम प्रीती झांगियानीने केले आहे या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न

मोहोब्बते फेम प्रीती झांगियानीने केले आहे या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न

googlenewsNext
ठळक मुद्दे२००८ मध्ये प्रीतीने बॉलिवूड करिअर सोडून लग्न करण्याचा निर्णय घेतला. मॉडेल आणि अ‍भिनेता प्रवीण डब्बाससोबत तिने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला आज 13 वर्षं झाली.

मोहोब्बते या चित्रपटात शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. त्यांच्यासोबतच चित्रपटात आणखी तीन जोड्या प्रेक्षकांना महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. यात आपल्याला प्रीती झांगियानी आणि जिमी शेरगिल यांची एक जोडी पाहायला मिळाली होती. 

प्रीतीने या चित्रपटाआधी एका अल्बममध्ये काम केले होते. तिच्यावर चित्रीत करण्यात आलेले छुई मुई सी... हे गाणे प्रचंड प्रसिद्ध झाले होते. प्रीती आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण सोशल मीडियावर मात्र कमालीची सक्रिय आहे. अर्थात इतक्या वर्षांत ही ‘मोहब्बतें’ गर्ल इतकी बदललीय की, तिला ओळखणे देखील कठीण होईल.

‘मोहब्बतें’ या चित्रपटानंतर प्रीतीने बॉलिवूडमध्ये टिकून राहण्याचे बरेच प्रयत्न केले. पण दुर्दैवाने यानंतरचे तिचे चित्रपट धडाधड आपटले. एलओसी, आन, अनर्थ या चित्रपटात ती दिसली. पण तिचे हे चित्रपट सुपरडुपर फ्लॉप ठरले. अखेर प्रीतीने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला.

२००८ मध्ये प्रीतीने बॉलिवूड करिअर सोडून लग्न करण्याचा निर्णय घेतला. मॉडेल आणि अ‍भिनेता प्रवीण डब्बाससोबत तिने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला आज 13 वर्षं झाली. प्रवीणने सोशल मीडियाद्वारे प्रीतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने प्रीती आणि त्याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. प्रवीण अभिनेताव्यतिरिक्त स्कूबा ड्रायव्हिंगही करतो. त्याला अंडरवॉटर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचीही आवड आहे. २०११ मध्ये प्रितीने पहिल्या बाळाला जन्म दिला. त्याचे नाव जयवीर आहे.यानंतर २०१६ मध्ये प्रिती दुसऱ्यांदा आई बनली. बाळाचे नाव देव असे ठेवण्यात आले.

प्रिती सध्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. आपल्या मुलांच्या संगोपनात ती बिझी आहे. प्रिती आजही स्वत:ला फिट ठेवते.

Web Title: preeti jhangiani is married to parvin dabas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.