प्रसून जोशी म्हणतात, ज्या गाण्यांचा महिलांनी विरोध करायला हवा, त्याच गाण्यांवर त्या नाचत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 17:26 IST2017-01-24T11:54:44+5:302017-01-24T17:26:11+5:30

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल २०१७ चा चौथा दिवस चांगलाच वादग्रस्त ठरला. फेस्टिव्हलमध्ये गेल्या रविवारी आयोजित केलेल्या परिचर्चेत लेखक प्रसून जोशी ...

Prasun Joshi says that the songs which the women should oppose, they are dancing on the same songs | प्रसून जोशी म्हणतात, ज्या गाण्यांचा महिलांनी विरोध करायला हवा, त्याच गाण्यांवर त्या नाचत आहेत

प्रसून जोशी म्हणतात, ज्या गाण्यांचा महिलांनी विरोध करायला हवा, त्याच गाण्यांवर त्या नाचत आहेत

पूर लिटरेचर फेस्टिव्हल २०१७ चा चौथा दिवस चांगलाच वादग्रस्त ठरला. फेस्टिव्हलमध्ये गेल्या रविवारी आयोजित केलेल्या परिचर्चेत लेखक प्रसून जोशी यांनी बॉलिवूडमधील काही सिनेमांमधील गाण्यांवर तीव्र आक्षेप घेत महिलांच्या भूमिकेविषयी आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या मते, ज्या गाण्यांचा महिलांनी विरोध करायला हवा, त्याच गाण्यांवर महिला नाचताना दिसत आहेत. प्रसून जोशी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

हिंदी सिनेमांमधील अनेक गीते लिहिणारे प्रसून जोशी यांनी अचानकपणे केलेल्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली असून, यामागे त्यांचा नेमका कोणाकडे रोष होता यावर आता तर्कवितर्क लावले जात आहेत. प्रसून जोशी यांनी म्हटले की, सध्या असे काही गाणी आहेत, ज्यावर आक्षेप घ्यायलाच हवा परंतु महिला याविषयी गंभीर नसताना दिसत आहेत. उलट त्या अशा गाण्यांवर बेभान होऊन नाचत आहेत. आपण कुठल्या गाण्यावर नाचत आहोत हे कदाचित त्यांना उमजत नसावे. राजस्थानमध्ये दरवर्षी आयोजित केल्या जाणाºया या फेस्टिव्हलचे हे दहावे वर्ष आहे. फेस्टिव्हलमध्ये प्रसून जोशी यांना एमिटी विश्वविद्यालयाने मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरविले आहे. 

प्रसून जोशींनी म्हटले की, मी जाहिराती बनविताना नेहमीच काही गोष्टींचा विचार करीत असतो. महिलांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचणार नाही, हा विचार माझ्या डोक्यात सातत्याने घोंगावत असतो. वयाच्या १५ वर्षांपासून मी कविता लिहीत आहे; मात्र कविता लिहून पोट भरणार नाही, याची जाणीव झाल्यानेच जाहिरात क्षेत्राकडे वळलो असल्याचेही त्यांनी सांगितले. 

प्रसूननी ‘तारे जमीं पर, भाग मिल्खा भाग आणि रंग दे बसंती’ या सुपरहिट सिनेमांबरोबरच अनेक हिट सिनेमांची गाणी लिहिली आहेत. प्रसून यांना दोन वेळा सर्वश्रेष्ठ गीत या श्रेणीत राष्टÑीय पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. साहित्य आणि कला क्षेत्रात त्यांच्या योगदानासाठी २०१५ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.  

त्यामुळे त्यांचे हे सूचक वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात असून, आगामी काळात यावर खडाजंगी होण्याची शक्यता आहे. हिंदी सिनेमांमधील गाणी असा शब्दप्रयोग केलेल्या प्रसून जोशी यांचा नेमका कोणत्या गाण्यांविषयी रोष होता, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. 

Web Title: Prasun Joshi says that the songs which the women should oppose, they are dancing on the same songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.